Vastu Tips: घरात या ५ वस्तू ठेवल्याने झपाट्याने वाढते धन-संपत्ती 

लाइफफंडा
Updated May 23, 2022 | 14:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips In Marathi | प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याही जीवनात चांगल्या सुख-सुविधांचा पाऊस पडावा. तसेच जीवनात धन-संपत्तीची कधीच कमतरता भासू नये आणि सगळे काही एकदम मनासारखे व्हावे.

Wealth increases rapidly by keeping these 5 items in the house
घरात या ५ वस्तू ठेवल्याने झपाट्याने वाढते धन-संपत्ती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वस्तिकचे चिन्ह घरात लावणे खूप शुभ असते.
  • घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी माता लक्ष्मीच्या पायांना घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावे.
  • हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे.

Vastu Tips In Marathi | मुंबई : प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याही जीवनात चांगल्या सुख-सुविधांचा पाऊस पडावा. तसेच जीवनात धन-संपत्तीची कधीच कमतरता भासू नये आणि सगळे काही एकदम मनासारखे व्हावे. दरम्यान यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही गोष्टी लावल्याने सकारात्मक वातावरण याशिवाय आनंदही येत असतो. घरातील सदस्यांवर याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. यामुळे नोकरी आणि व्यवसायात तर लाभ होतोच शिवाय आर्थिक चणचणीपासून देखील सुटका होते. (Wealth increases rapidly by keeping these 5 items in the house). 

अधिक वाचा : राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? काय म्हणाले आरोग्य मंत्री

१) स्वस्तिकचे चिन्ह

Swastik

शास्त्रांनुसार, स्वस्तिकचे चिन्ह घरात लावणे खूप शुभ असते. पौराणिक कथांमध्ये स्वस्तिकच्या चिन्हाला माता लक्ष्मी आणि गणपती यांचे प्रतिक मानले आहे. स्वस्तिक शब्द संस्कृत मधील सु आणि अस्ति यांना मिळवून केला आहे, ज्याचा अर्थ होतो शुभ. असे मानले जाते की स्वस्तिकचे चिन्ह माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते. लक्षणीय बाब म्हणजे हिंदू घर्मातील बहुतांश शुभ कार्यांमध्ये स्वस्तिक बनवले जाते. 

२) माता लक्ष्मीचे पाय

If you want the grace of Goddess Lakshmi all year round

तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी माता लक्ष्मीच्या पायांना घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे पाय असतात, त्या घरामध्ये दु:ख दारिद्र यांना थारा नसतो अशी मान्यता आहे. या पायांना घरामध्ये लावल्याने घरात आनंदाचे आगमन होते. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या पायांना तुमच्या घरात लावू शकता. 

३) तुळशीचे रोप 

tree

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की माता तुळशी माता लक्ष्मीचेच रूप आहे. जर नियमितपणे तुळशीच्या रोपाची पूजा केली तर मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. घरासमोर तुळशीचे रोप लावल्याने घरात कधीच अशांती नांदत नाही आणि घर धन-धान्याने भरलेले राहते. लक्षणीय बाब म्हणजे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुमच्या घरात जरूर तुळशीचे रोप लावा. दररोज अंघोळ केल्यानंतर या रोपाची पूजा केल्याने शुभ लाभ मिळतो. 

४) मोराचे पिस

Peacock

हिंदू धर्मामध्ये मोराच्या पिसांना अत्यंत शुभ मानले जाते. मोराची पिसे फक्त भगवान श्री कृष्णालाच पसंत नाही तर, माता लक्ष्मी देव, इंद्रदेव यांसहीत अनेक देवांना प्रिय आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात मोराच्या पिसांना खूप महत्त्व आहे. काही लोक घर सजवण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर करतात. तर काही लोक आपल्या ग्रथांत अथवा पुस्तकात मोराचे पिस ठेवतात. घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी तुम्ही देखील घरामध्ये पूजेच्या ठिकाणी मोराचे पिस जरूर ठेवा. जर घरामध्ये पूजेची जागा नसेल तर तुम्ही ज्या ठिकामी तुमचे धन ठेवता तिथे हे पिस ठेवा. 

५) चांदीचा हत्ती 

silver elephant

वास्तुशास्त्रामध्ये चांदीच्या हत्तीला शुभ मानले आहे. याचा सकारात्मक प्रभाव होतो. याशिवाय जर तुमच्या घरामध्ये राहू-केतू यांचा वाईट प्रभाव असेल तर तो देखील संपेल. चांदीचा हत्ती ठेवल्याने व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते. याला घरात ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी