Lagna Patrika format mayna charoli in marathi: हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्तानुसारच नव्या कार्याची सुरुवात करण्यात येते. त्यामुळेच हिंदू धर्मात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचागानुसार वर्षभरात असे काही दिवस असतात ज्यावेळी कोणतेही शुभ कार्य करताना मुहूर्त पाहिला जात नाही तर त्या दिवशी केवळ शुभ वेळ पाहिली जाते. यामध्ये अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा, दसरा, देवउठनी एकादशी या सारख्या दिवसांचा समावेश आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, लग्नासाठी शुभ मुहूर्त फार गरजेचे आहे. (Wedding Invitation text messages in marathi lagn patrika format mayna ideas charoli for whatsapp)
लग्न पत्रिका कशी असावी आणि त्याच मायना किंवा फॉरमॅट कसा असावा याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तसेच सध्याच्या टेक्नोसॅवी युगात WhatsApp वर सुद्धा अनेकजण लग्नाचे आमंत्रण पाठवतात यामुळे खर्चही वाचतो आणि वेळेचीही बचत होते. जाणून घेऊयात लग्नपत्रिकेचा मायना आणि फॉरमॅट नेमका कसा असावा?
हे पण वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?
|| श्री गणेशाय नम: ||
आमच्या येथे श्री कुलस्वामिनी कृपेने,
चि. (मुलाचे नाव)
आणि
चि. सौ. का. (मुलीचे नाव)
यांचा शुभविवाह
मिती वैशाख कृ. शके 1944 (वार आणि दिनांक) रोजी (लग्नाचा शुभ मुहूर्त, वेळ) या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत.
विवाहस्थळ
जीवनातील एक अनमोल क्षण.... एक आनंद सोहळा.... एक पवित्र बंधन....
दोन मनांना अग्नी साक्षीने सात फेऱ्यांच्या ऋणानुबंधनात बांधणार....
एक सुंदर नाते दृढ करण्यासाठी...
आपले शुभ आशीर्वाद देण्यास आपण सर्वांनी यावे...
हे आग्रहाचे निमंत्रण....
आपले स्नेहांकित
वरील विनंतीस मान देऊन आपण अगत्य येण्याची कृपा करावी.
हे पण वाचा : या 6 टिप्सने तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्यास राहाल नेहमीच उत्सुक
----------------------------------------------------------------------------------------------------------
|| श्री गणेशाय नम: || || श्री ज्योतिर्लिंगम प्रसन्न ||
स. न. वि. वि. श्री कृपेकरून आमचे घरी
चि. सौ. कां. (मुलीचे नाव)
(मुलीच्या वडिलांचे नाव) यांची ज्येष्ठ सुकन्या
आणि
चि. (मुलाचे नाव)
(मुलाच्या वडिलांचे नाव) यांचा ज्येष्ठ सुपुत्र
यांचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे.
दिनांक -
वार -
वेळ -
दिनांक -
वार -
वेळ - शुभ मुहूर्त -
आपले स्नेहांकित...
वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.