Weight Loss : लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, कशी कराल वजनवाढीची तपासणी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 09, 2021 | 10:59 IST

वजन वाढलेल्या लोकांना जिम जाण्याचा अथवा रोज ५ किलोमीटर धावण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र प्रत्येकाला इतका वेळ काढणे शक्य नसते.

Weight Loss  Home remedies for early weight loss
Weight Loss : लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वजनवाढ अथवा जाडी हा काही खूप मोठा आजार नाही
  • तुम्ही किती फिट आहाता हे जाणून घेण्यासाठी, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढून घेणं हा चांगला पर्याय.
  • भारतीय लोकांसाठी त्यांचं बीएमआय २२.९ पेक्षा अधिक असता कामा नये.

मुंबई : वजन वाढलेल्या लोकांना जिम जाण्याचा अथवा रोज ५ किलोमीटर धावण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र प्रत्येकाला इतका वेळ काढणे शक्य नसते. मात्र याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वेळ नाही हे सांगून सर्व काही टाळण्याचा एक बहाणा मिळाला. जिम अथवा बाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामानेच वजन घटते असे नाही. त्यासाठी काही सोप्या घरगुती पद्धतीही आहेत, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. 

घरगुती उपाय करण्याआधी किंवा वजन कमी करण्यासाठी इतर गोष्टी करण्याआधी आपल्याला आपलं वजन किती वाढत आहे याची तपासणी करणं आवश्यक असतं. आज आपण या लेखात वजन कमी करण्याचे घरगुती उपाय आणि तासणी कशी करायची हे जाणून घेणार आहोत... 

वजनवाढीची तपासणी अशी करावी (Check Your Weight)

वजनवाढ अथवा जाडी हा काही खूप मोठा आजार नाही. मात्र, एक स्वस्थ आणि चांगल्या शरीराची ही निशाणी नक्कीच नाही. वेळीच याबाबत हातपाय उचलले तर याच्या दुष्परिणांपासून तुम्ही दूर राहू शकता. तुम्ही किती फिट आहाता हे जाणून घेण्यासाठी, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढून घेणं हा चांगला पर्याय आहे. यामधून तुम्ही किती फिट आहात आणि किती वजन कमी करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. त्यासाठी वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) हे जाणून घेऊ शकता.

काय आहे BMI (बी.एम. आय)? (What Is BMI)

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तुमच्या शरीरामध्ये किती जास्त चरबी आहे याची माहिती देते. बीएमआय हे व्यक्तीच्या उंची आणि वजनानुसार तुम्हाला जाणवून देते. कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला तपासून त्या व्यक्तीचं वजन कमी करायला हवं की नको हे डॉक्टर त्याच्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बघूनच निर्णय घेत असतात. यातून तुम्ही किती फिट आहात हे कळतं. उदाहरणार्थ भारतीय लोकांसाठी त्यांचं बीएमआय २२.९ पेक्षा अधिक असता कामा नये. बऱ्याच महिला या ओव्हरवेट झाल्यानंतरच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयींसह नेहमी बीएमआय तपासणीदेखील करून घ्यायला हवी. 

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय (Home Remedies for Weight Loss)

 

गरम पाणी प्यायला सुरुवात करा

 

उन्हाळा असो वा हिवाळी नेहमी गरम पाणी प्यावे. सकाळी सकाळी उपाशीपोटी मध घालून गरम पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिजम वाढते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र खाल्ल्यानंतर साधारण अर्धा वा एक तासानेच पाणी प्यायला हवे हे लक्षात ठेवा.

जिन्यांचा वापर जास्त करावा

तुम्ही तुमच्या घराचे जिने दिवसातून १० वेळा चढून उतरलात तरीही तुमचे वजन कमी व्हायला मदत होईल. घरी असाल तर गच्चीत जाण्याची कोणतीही संधी सोडू नका. जिन्यांचा चढ - उतार तुमच्यासाठी एक योग्य व्यायाम आहे. ऑफिसमध्ये जाताना लिफ्टऐवजी जिन्यांनी चढ-उतार करण्याचा प्रयत्न करा. याचा चांगला परिणाम होतो.

भरपूर झोपा

तुम्हाला खरंच वजन कमी करायचे असेल तर, भरपूर झोपा. झोपेच्या वेळी तुमच्या शरीराचा थकवा आणि ताण मिटतो. वजन घटवण्याच्या प्रक्रियेत भरपूर झोप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या हंगर हार्मोन्सनादेखील झोप स्थिर करते, ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहाते.

 जिऱ्याचं पाणी

वजन कमी करण्यासाठी जिरे हे रामबाण औषध आहे. एक चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास, तीनपट वेगाने तुमचे वजन कमी होते. एका संशोधनातून वजन कमी करण्यासाठी जिरे महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. हे केवळ जास्त कॅलरीच बर्न करत नाही तर, मेटाबॉलिजमचा रेट वाढवून पचनक्रियादेखील नीट करते.

दिवसभरात १ लिंबू गरजेचे

लिंबामध्ये विविध विटामिन्स आणि मिनरल्स असल्याचे म्हटले जाते आणि रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने खूप फायदे होतात. पाण्यात लिंबू पिळून पाणी प्यायल्यास, विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळते. लिंबू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी १ लिंबू आपल्या शरीरात जाणे गरजेचे आहे. यापेक्षा जास्त लिंबू खाऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी