Weight Loss: स्लिम बॉडी हवी असेल तर महिलांनो रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही करू नका ही कामे

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 14, 2022 | 07:45 IST

Health Tips: वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही वाईट सवयी सोडून वजन कमी करू शकता. त्या कोणत्या वाईट सवयी आहेत. ज्या तुम्ही आज सोडल्या पाहिजेत हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत..

Weight Loss
रात्रीची ही कामे करा बंद, बॉडी होईल स्लिम   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित व्यायाम करणे.
  • झोपण्याआधी शीतपेये प्यायल्याने चरबी वाढते.
  • झोपताना अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया कमी होते.

Weight Loss Tips:  नवी दिल्ली :  वजन (Weight) कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित व्यायाम (Exercise) करणे. परंतु आपण रोज व्यायाम केला जात नाही. यामागे एक कारण आहे, ते म्हणजे कामामुळे होणारा थकवा आणि कामांचा वाढलेला बोझा. अशा वेळी प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की असे काय करावे जे रोज करायला जास्त वेळ लागणार नाही आणि वजनही कमी होईल. लठ्ठपणामुळे (Obesity) सामाजिक जीवनात आपला आत्मविश्वास कमी होत असतो. विशेषत महिलांना वजन वाढीची समस्या अधिक त्रासदायक वाटत असते. वजन वाढल्यामुळे त्यांना बऱ्याचवेळा नवऱ्याची टोमणे ऐकावी लागतात. हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काही वाईट सवयी सोडून तुम्ही वजन कमी करू शकता. त्या कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या तुम्ही आजच सोडल्या पाहिजेत, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत, चला जाणून घेऊया वाईट सवयी. 


झोपण्यापूर्वी थंड पेय पिऊ नका - 

उन्हाळ्यात अनेकजण शरीराला थंडावा देण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सहारा घेतात, अनेकजण रात्री जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी थंड पेयचं सेवन करत असतात.  झोपण्याआधी शीतपेये प्यायल्याने चरबी वाढते. त्यामुळे त्याचे सेवन टाळावे.

रात्रीचे जेवण हलके असावे-

दिवसातून 4 मील म्हणजेच जेवण घेणे खूप महत्वाचे आहे. यातून रात्रीच्या जेवणाचेही महत्त्व आहे. बरेच लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळी जड जेवण घेतात, जे योग्य नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही रात्री जास्त अन्न खाल्ले तर वजन वाढू लागते.

रात्री दारू घेऊ नका

मर्यादेत मद्यपान केल्याने शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण बरेच लोक झोपायच्या आधी याचे सेवन करतात जे आरोग्यासाठी तर हानिकारक आहेच पण तुमच्या वजनासाठी देखील योग्य नाही. झोपताना अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया कमी होते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

झोपताना दिवे बंद करा

झोपताना लाइट्स बंद करून झोपण्याची सवय नसेल, तर ही सवय जितक्या लवकर सुधाराल तितके चांगले. आम्ही तुम्हाला सांगतो की जे लोक प्रकाशात झोपतात त्यांना ना चांगली झोप येते आणि ना त्यांना जास्त झोप येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी