Weight Loss Recipe: वजन कमी करायचं आहे? रात्रीच्या जेवणासाठी खास 'ओट्स खिचडी'ची रेसिपी

Oats khichdi recipe: वजन कमी करण्यासाठी ओट्सची खिचडी खूप फायदेशीर मानली जाते. खूप साऱ्या भाज्यापांसून बनवलेली ओट्स खिचडी खूप चविष्ट लागते. जाणून घ्या याची रेसिपी.

oats khichdi recipe
ओट्स खिचडी' रेसिपी (Image Source: cookingwithsiddhi)   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

 • वजन कमी करताना लोकं सर्वात पहिलं आपलं डाएट बदलतात.
 • वजन कमी करण्यासाठी ओट्सपासून बनवलेली खिचडी खूप फायदेशीर मानली जाते.
 • ही खिचडी खूप हलकी असते ती सहज पचते. 

वजन कमी करताना लोकं सर्वात पहिलं आपलं डाएट बदलतात. अशात कमी कॅलेरी असलेल्या गोष्टी खूप काम करतात. जर का तुम्ही डिनरमध्ये सलाड किंवा सूप पिऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हांला ओट्सची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. वजन कमी करण्यासाठी ओट्सपासून बनवलेली खिचडी खूप फायदेशीर मानली जाते. ही खिचडी खूप हलकी असते ती सहज पचते. 

ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यासोबतच त्यात पोषक तत्त्वही आहेत. ओट्स खिचडीमध्ये सर्व हिरव्या भाज्या टाकल्यानंतर ही खिचडी खूप चविष्ट लागते. इतकंच काय तर ही खिचडी खूप कमी वेळेत बनवली जाऊ शकते. यासोबतच ही खिचडी तूपासोबत गरम गरम खाल्ल्यास आणखीनच चविष्ट लागते.

ओट्स खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

1/2 कप मूग डाळ
1 कप ओट्स (मिक्सरमधून बारिक केलेलं)
1 चमचा जिरं 
1 इंच बारिक केलेलं आलं
1 हिरवा मिरची 
1 छोटा कांदा बारिक केलेला 
1 टोमॅटो बारिक कापलेला
1/2 गाजर बारिक कापलेला
4 फरसबी बारिक कापलेली
4 कप पाणी
1/2 चमचा हळद
हिंग
कडीपत्ता
1 चमचा तूप
मीठ चवीनुसार

ओट्स खिचडी बनवण्याची कृती 

 1. सर्वांत प्रथम मूग डाळ 5 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा.
 2. याव्यतिरिक्त एका प्रेशर कुकरमध्ये तूप गरम करा, त्यात जिरं आणि हिंग टाका.
 3. त्यानंतर त्यात कडिपत्ता, आलं टाका. 
 4. नंतर कापलेला कांदा, हिरवी मिरची टाकून मिश्रण गुलाबी होईपर्यंत शिजवा. 
 5. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाका. ते नरम आणि मऊ होईपर्यंत शिजू द्या.
 6. त्यानंतर गाजर आणि बीन्स (फरसबी) टाका आणि दोन- तीन मिनिटं मिश्रण हलवा. 
 7. नंतर भिजत ठेवलेली डाळ आणि ओट्स टाका. डाळीतलं पाणी काढून टाका. त्यानंतर हे 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. 
 8. मीठ टाकून मिश्रण 2 ते 3 मिनिटं हलवा. 
 9. त्यात 4 कप पाणी टाका आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. 
 10. तुम्ही हे पातळं किंवा घट्ट बनवायचं आहे त्यानुसार त्यात पाणी टाका. मध्यम आचेवर दोन शिट्टी पर्यंत प्रेशर कुकरमध्ये खिचडी शिजवा. 
 11. शेवटी ओट्स सलाडसोबत थोडीशी कोथिंबीरनं गार्निश करून गरम गरम खा. 

ओट्स खिचडीनं केवळ वजन कमी करण्यासाठी मदतशीर नसून हृदयाच्या समस्या आणि कोलेस्ट्रॉलमध्येही फायदेशीर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी