काय सांगता ! इंटीमसीऐवजी कपलने बेडवर कराव्यात या गोष्टी, दोघांमधील वाढेल प्रेम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated May 11, 2022 | 19:56 IST

लग्नानंतर कपल फक्त फिजिकल इंटीमेसी एक्सप्लोर करतात असं नाही. अनेकदा खूप वेगवेगळ्या गोष्टींवर बेडरूममध्ये चर्चा केली जाते. खरं तर हेच लग्नानंतरची खरी पार्टनशिप असते. लग्नानंतर कपल अनेक गोष्टी एकत्र फेस करत असतात. काही गोष्टी अतिशय सामान्य असतात तर काही गोष्टींमध्ये खूप थ्रिल असते. इंटिमेसी हा लग्नानंतरचा महत्वाचा भाग आहे. मात्र यासोबतच कपल अशा गोष्टींची चर्चा करावी ज्यातून दोघांच्या प्रेमाला बहर येईल. 

these things a couple should do in bed instead of intimacy
इंटीमसीऐवजी कपलने बेडवर कराव्यात या गोष्टी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवरा-बायकोनं मनातील प्रत्येक खासगी गोष्टीविषयी चर्चा करावी.
  • नवरा-बायको काम करताना त्यांचा दिवस वेगळा असू शकतो. अशावेळी तुम्ही एकमेकांचा दिवसाचा अनुभव एकमेंकांना सांगा.

नवी दिल्ली : लग्नानंतर कपल फक्त फिजिकल इंटीमेसी एक्सप्लोर करतात असं नाही. अनेकदा खूप वेगवेगळ्या गोष्टींवर बेडरूममध्ये चर्चा केली जाते. खरं तर हेच लग्नानंतरची खरी पार्टनशिप असते. लग्नानंतर कपल अनेक गोष्टी एकत्र फेस करत असतात. काही गोष्टी अतिशय सामान्य असतात तर काही गोष्टींमध्ये खूप थ्रिल असते. इंटिमेसी हा लग्नानंतरचा महत्वाचा भाग आहे. मात्र यासोबतच कपल अशा गोष्टींची चर्चा करावी ज्यातून दोघांच्या प्रेमाला बहर येईल. 

आयुष्याबद्दलचा विचार समजून घेणं

कपल कायमच एकमेकांशी आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलावे. कुणाला फिरायला कुठे आवडतं तिथपासून अगदी मनातील प्रत्येक खासगी गोष्टीविषयी चर्चा करावी. अशावेळी तुमच्या प्रेमाच्या क्षणांचा देखील यामध्ये समावेश करावा. याप्रकराची चर्चा केल्यानं तुमच्या कामावरील ताण तुम्ही विसराल. 

एकमेकांची तब्बेत सांभाळणं

एकत्र कुटुंब असलं की, प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत बेडरूममध्ये मोकळेपणाने वागू शकतो. हल्ली आपल्याला माहित आहे नवरा-बायको दोघंही कामाला जातात. अशावेळी थोडी दुखणी डोकी वर काढू शकतात. अशावेळी पत्नीला थोडा पतीने हेड मसाज दिला तर तो त्यांचा खास क्षण आहे. यामुळे या दोघांच नातं अधिक फुलत असतं.

एकमेकांशी व्यतित केलेल्या दिवसाबद्दल चर्चा करावी

नवरा-बायको काम करताना त्यांचा दिवस वेगळा असू शकतो. अशावेळी तुम्ही एकमेकांचा दिवसाचा अनुभव एकमेंकांना सांगा. कामाचा अनुभव देखील यामध्ये बोलला जातो. मुंबईतील प्रवास हा प्रत्येकवेळी वेगळा असतो. या प्रवासाची देखील चर्चा केली जाऊ शकते. 

मोकळेपणाने गप्पा करा

लग्नानंतर नातं फुलतं असतं मग ते लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज. बेडरूममध्ये कपल स्वतःचा मी टाईम घालवत असतात. अशावेळी ते त्यांची मत मोकळेपणाने मांडतात. यावेळी कोणत्याही विषयावर अतिशय मोकळेपणाने बोललं जातं आणि मत मांडल जातं. जर तुम्हाला काही गोष्टी कुणाशीच नाही पण पार्टनरशी बोलायची असेल तर बेडरूम ही जागा त्यासाठी परफेक्ट असते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी