Kiara Advani फिट राहण्यासाठी काय खाते? कसे ठेवते त्वचा ताजीतवानी, सांगितले सीक्रेट

Kiara Advani fitness secret : कियारा अडवाणी ही फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यामागे अनेक सिक्रेट असले तरी चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी कियारा अडवाणीला तिच्या आहारात फक्त एकाच गोष्टीचा समावेश करायला आवडते.

What does Kiara Advani eat to stay fit? How to maintain weight, told secret
Kiara Advani फिट राहण्यासाठी काय खाते? कसे ठेवते वजन मेंटेन, सांगितले सीक्रेट ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • कियाराच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडले
  • कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जवळीकता वाढली
  • तिच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तिच्या आहारात काय करते?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे. कियारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मध्यंतरी अशी बातमी आली होती की, दोघेही वेगळे झाले आहेत, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा कलाकारांमध्ये जवळीक पाहायला मिळत आहे. अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियारा अडवाणीला भेटण्यासाठी तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पोहोचला होता. तसेच, चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना मिठी मारताना दिसले.

अधिक वाचा : 

Relationship Tips : जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडण करण्याऐवजी या टिप्स आणा अंमलात...


फिटनेससाठी कियारा काय खाते?

पाहिले तर कियारा अडवाणी ही फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यामागे अनेक रहस्ये असली तरी चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी कियारा अडवाणीला तिच्या आहारात फक्त एकाच गोष्टीचा समावेश करायला आवडते. कियारा अडवाणी या तिन्ही जेवणात दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाचणीचे पीठ खात असते. या पीठात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात जे चरबी लवकर खाली पाडण्यास सक्षम असतात. हे उच्च फायबर पीठ शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम आहे.

अधिक वाचा : 

Wife Secrets: महिला कधीच पतीला सांगत नाहीत या ५ गोष्टी; जाणून घ्या स्त्रियांचे मुख्य ५ सीक्रेट

नाचणीचे पीठ हे अँटी-एजिंग सिरीयल आहे जे त्वचेवर चमक आणते. त्यामध्ये अमीनो ऍसिड असतात जे त्वचेला पुरळ, निस्तेज आणि सुरकुत्या यापासून वाचवतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला तणावापासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. त्वचेच्या पेशी बनवते आणि व्यक्तीला अधिक तंदुरुस्त, निरोगी आणि तरुण देखावा देते. हे पचनासाठी देखील खूप चांगले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी