Today in History 14 May : दिनविशेष : १४ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?

What Happened Today in History on 14 May, dinvishesh : आज १४ मे. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

What Happened Today in History on 14 May, dinvishesh
Today in History 14 May : दिनविशेष : १४ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Today in History 14 May : दिनविशेष : १४ मे, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला
 • काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली

What Happened Today in History on 14 May, dinvishesh : आज १४ मे. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

१४ मे रोजी जन्म :

 1. १९९८ - रसना गर्ल तरुणी सचदेव हिचा जन्म (मृत्यू - १४ मे २०१२)
 2. १९८४ - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग
 3. १९८१ - भारतीय वंशाचे संगणक तज्ज्ञ प्रणव मेस्री
 4. १९२६ - आनंदग्रामच्या संस्थापिका, समाजसेविका डॉ. इंदू पटवर्धन
 5. १९२२ - फ्रांजो तुमनन, क्रोएशियाचे पहिले अध्यक्ष
 6. १९०९ - वसंत शिंदे, विनोदवीर, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार सन्मानीत
 7. १८९८ - मलावीचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा
 8. १६५७ - छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती
   

१४ मे रोजी झालेले मृत्यू :

 1. २०१३ - लेखक असगर अली इंजिनिअर 
 2. २०१२ - रसना गर्ल तरुणी सचदेव 
 3. १९९८ - हॉलिवूड अभिनेता गायक फ्रँक सिनात्रा
 4. १९७८ - नाटककार लेखक जगदीश चंद्र माथुर 
 5. १९६३ - भाषाशास्त्रज्ञ आणि राजकारणी डॉ. रघुवीरा 
 6. १९२३ - कायदेपंडीत समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर 
 7. १८७९ - न्यूझीलंडचे पहिले पीएम हेन्री सिवेल
 8. १६४३ - फ्रान्सचा राजा तेरावा लुई

१४ मे रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना :

 1. १९९७ - भारतात पहिला महिला सहकारी साखर कारखाना, इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना या नावाने कारखान्याची नोंदणी
 2. १९६३ - कुवेत संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल
 3. १९६० - एअर इंडियाची मुंबई - न्यूयॉर्क विमानसेवा सुरू
 4. १९५५ - सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया, पूर्व जर्मनी यांच्यात पोलंडमधील वॉर्सा येथे पुढील २० वर्षांसाठी संरक्षण सहकार्य करार
 5. १९४० - दुसऱ्या महायुद्धात हॉलंड जर्मनीला शरण
 6. १७९६ - इंग्लंडमध्ये ग्लुस्टरमधील बर्कले येथे आठ वर्षीय जेम्स फिलीपला पहिली देवीची लस टोचली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी