Fist Diet: व्यायामाशिवाय दर महिन्याला कमी करा ३ ते ४ किलो वजन

आपण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर आपल्यासाठी आम्ही एका नव्या डाएटची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये एक महिन्यात आपलं वजन जवळजवळ ३ ते ४ किलो कमी होऊ शकतं.

what is fist diet without exercise three to four kilograms of weight will be reduced every month
व्यायामाशिवाय दर महिन्याला कमी करा ३ ते ४ किलो वजन 
थोडं पण कामाचं
  • फिस्ट डाएट फॉलो केल्याने ३ ते ४ किलो वजन होईल कमी
  • फिस्ट डाएट करताना व्यायामाची फार आवश्यकता नाही
  • जाणून घ्या फिस्ट डाएट नेमकं आहे तरी काय

How to Lose Weight: वजन कमी करण्याचे सर्वात अचूक तत्त्व म्हणजे 'कॅलरी इन विरुद्ध कॅलरीज आउट'. म्हणजेच तुम्ही किती कॅलरीज खात आहात आणि किती कॅलरीज बर्न करत आहात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी हे तत्व पाळावेच लागेल. 

जर तुम्ही मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा कमी खाल्ले तर तुमचे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे डाएट फॉलो करतात. जसे की पेलिओ डाएट, कीटो डाएट, लो-कार्ब डाएट इ. अशाच एका डाएटचे नाव आहे फिस्ट डाएट. या डाएटमधील ठराविक प्रमाणात कॅलरीज खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे हा डाएट फॉलो करताना आपल्याला व्यायाम करण्याची गरज नाही.

फिस्ट डाएट आहे तरी काय? (What is Fist Diet)

फिस्ट डाएट याला आपण मूठभर डाएट असंही म्हणू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला मूठभर अन्न घ्यावे लागते. या आहारात तुम्हाला तीन वेळा आणि प्रत्येक जेवणात चार मूठभर अन्न खावे लागते. तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबर यांचा समावेश असावा. 

अधिक वाचा: Today in History: Thursday 7th July 2022: दिनविशेष: गुरूवार, ७ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात दररोज तीन जेवणात चमचाभर फॅट म्हणजेच तूप किंवा तेल असले पाहिजे. या आहारामुळे प्रत्येक आठवड्यात सुमारे 400-900 ग्रॅम वजन कमी होऊ शकते.

अधिक वाचा: World Chocolate Day 2022 Wishes: 'वर्ल्ड चॉकलेट डे' दरवर्षी 7 जुलै रोजी का साजरा करतात? चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting

फिस्ट डाएटमध्ये या गोष्टी खाणे टाळा

फिस्ट डाएटमध्ये नेहमी संतुलित आहार घेतला जातो. समजा तुम्ही या डाएटमध्ये मर्यादित कॅलरीजमध्ये काहीही खाऊ शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही फास्ट फूड, चॉकलेट आणि मिठाई खाण्यास सुरुवात कराल. या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट आणि फायबर युक्त गोष्टी खाव्या लागतात. 

जेवणाचे तीन भाग करा आणि नंतरच सेवन करा. प्रोटीनसाठी मांस, मासे आणि अंडी खाऊ शकतात. भाज्या, पास्ता, तांदूळ, बटाटे, तृणधान्ये आणि ब्रेड कार्बोहायड्रेट म्हणून खाऊ शकतात. नट्स फॅट म्हणून खाऊ शकतात, पण जर तुम्हाला ड्रायफ्रुट्सची अॅलर्जी असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, चीज आणि बटर खाऊ शकता.

अधिक वाचा: How to Clean Utensils: जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' उपाय करा, धुतल्यानंतर दिसतील एकदम चकाचक

फिस्ट डाएटमध्ये व्यायाम करणे आवश्यक?

फिस्ट डाएटमध्ये व्यायाम करणे आवश्यक नाही. परंतु तज्ज्ञ शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याची शिफारस करतात. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुमचे वजन हळूहळू कमी होईल, पण जर तुम्ही आहारासोबत वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ करत असाल तर झपाट्याने वजन कमी होऊ शकते आणि त्यामुळे एका महिन्यात 3-4 किलो वजन कमी होऊ शकते. जर कोणी रोज 30 मिनिटे व्यायाम करत असेल तर त्याला लवकर परिणाम मिळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी