व्हॅलेंटाईन डेचे चॉकलेट डेशी कनेक्शन...जाणून घ्या आरोग्यासाठी याचे फायदे

लाइफफंडा
Updated Feb 09, 2021 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

व्हॅलेंटाईन वीक दरम्यान चॉकलेट डे साजरा करणाऱ्या कपल्सची संख्या अधिक आहे. कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच चॉकलेट खायला आवडते. 

chocolate
व्हॅलेंटाईन डेचे चॉकलेट डेशी कनेक्शन...आरोग्यासाठी फायदे 
थोडं पण कामाचं
  • व्हॅलेंटाईन वीक दरम्यान चॉकलेट डे साजरा करणाऱ्या कपल्सची संख्या अधिक आहे
  • चॉकलेट प्रामुख्याने कोको, दूध आणि साखरेच्या मिश्रणाने बनवले जाते.
  • खासकरून ब्लड प्रेशरच्या रुग्णांना चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.

मुंबई: व्हॅलेंटाईन वीक(valentine week) सुरू आहे. या व्हॅलेंटाईन वीकमधील आज तिसरा दिवस चॉकलेट डे(chocolate day) असा साजरा केला जातो. 'कुछ मीठा हो जाये' असे स्लोगन असलेल्या विशेष कंपनीकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या चॉकलेटने नेहमीच प्रेम व्यक्त कऱणाऱ्या कपल्साठी विशेष भूमिका साकारली आहे. याच कारणामुळे व्हॅलेंटाईन वीक दरम्यान चॉकलेट डे साजरा करणाऱ्या कपल्सची संख्या अधिक आहे. कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच चॉकलेट खायला आवडते. 

चॉकलेटचे व्हॅलेंटाईन कनेक्शन

विक्टोरियन काळापासून महाद्वीपमध्ये आणि अमेरिकेत प्रेम करणारे पुरुष आणि महिला एकमेकांना चॉकलेट म्हणून गिफ्ट देतात. या दरम्यान चॉकलेट बनवणारी कंपनी कॅडबरीजचे मालक रिचर्ड कॅडबरीचे आगमन झाले. त्या वेळेस ते सर्च करत होते की एक चांगला स्वाद असलेल्या कोक बटर काढण्याची योग्य पद्धत काय असू शकते. यानंतर कॅडबरीज क्यूब शेपमध्ये अस्तित्वात आली. त्यांनीस्वत: ते सुंदर पद्धतीने पॅक केले. दोन प्रेम करणाऱ्यांना चॉकलेटचे हे नवे रूप खूप आवडले. १८६१मध्ये चॉकलेट व्यावसायिकांनी दिलच्या आकाराच्या बॉक्सवर रंगीत गुलाबाचे फल आणि कळी असलेल्या प्रिंटयुक्त चॉकलेट पॅक तयार केले. व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना हे पॅकिंग खूपच आवडले. त्यानंतर हे चॉकलेट पॅक गिफ्ट म्हणून देण्यास सुरूवात केली. वेळेसोबत चॉकलेट विविध शेपमध्ये विकसित होत गेले. याच कारणामुळे व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचे गिफ्ट म्हणून चॉकलेट दिले जाते. 

चॉकलेटचे फायदे

चॉकलेट प्रामुख्याने कोको, दूध आणि साखरेच्या मिश्रणाने बनवले जाते. यासाठी हे आरोग्यासाठी चांगले असते. चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयाचे कार्य सुरळीत चालते. खासकरून ब्लड प्रेशरच्या रुग्णांना चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो. चॉकलेटमध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स फ्लॅनोनाईड असते. ज्यातील मुख्य घटक पॉलिफेनॉल्स असतात. मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासाठीही चॉकलेट खाल्ले जाते. दरम्यान, चॉकलेटचे अधिक प्रमाणातही सेवन करू नये. याचे शरीरात दुष्परिणाम जाणवतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी