Beauty Tips For 2022 : डार्क चॉकलेट वॅक्स आणि व्हाईट वॅक्समध्ये काय फरक आहे? जाणून घ्या कोणते वॅक्स त्वचेसाठी उत्तम

लाइफफंडा
Updated Jan 01, 2022 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Beauty Tips For 2022 : जर तुम्हाला चॉकलेट वॅक्स करायला आवडत असेल तर आधी तुम्हाला डार्क चॉकलेट वॅक्स आणि व्हाईट वॅक्समधील फरक जाणून घ्या.

Benefits of Dark Chocolate Wax and White Chocolate Wax
डार्क चॉकलेट वॅक्स आणि व्हाईट चाॉकलेट वॅक्सचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्हाईट आणि डार्क चॉकलेट वॅक्स त्वचेसाठी उत्तम
  • त्वचेवरील टॅन काढण्यासाठी डार्क चॉकलेट वॅक्स योग्य पर्याय
  • व्हाईट चॉकलेट वॅक्समध्ये असलेले मेण त्वचेला खोल पोषण देते.

Beauty Tips For 2022 : स्कीनवरील नको असलेले केस काढण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु आजही महिला वॅक्स लावणे पसंत करतात. यामुळे त्यांची त्वचा अधिक गुळगुळीत तर होतेच, पण त्यामुळे केस मुळापासून बाहेर पडतात, त्यामुळे केसांची वाढही हळूहळू कमी होऊ लागते. वॅक्सिंगची पद्धत जरी थोडी वेदनादायक असली तरीही ती तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देते.

बाजारात अनेक प्रकारचे वॅक्सिंग पर्याय उपलब्ध असून,  प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत. या विविध प्रकारच्या वॅक्सिंगमध्ये, स्त्रीया  बऱ्याचदा चॉकलेट वॅक्सला प्राधान्य देतात. 
चॉकलेट वॅक्समध्येही डार्क चॉकलेट वॅक्स आणि व्हाइट चॉकलेट वॅक्सचा पर्याय बहुतांश पार्लरमध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही वेगळ्या प्रकारचे वॅक्स आहेत आणि ते त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. 


डार्क चॉकलेट वॅक्स

डार्क चॉकलेट वॅक्स हे सामान्य वॅक्सच्या तुलनेत खूप चांगले मानले जाते. डार्क चॉकलेट वॅक्समध्ये अनेक प्रकारचे घटक वापरले जातात. उदाहरणार्थ, कोको, सोयाबीन तेल, बदाम तेल, ग्लिसरीन, जीवनसत्त्वे आणि ऑलिव्ह ऑईल इ. हे सर्व घटक तुमच्या त्वचेवरील केसच काढून टाकत नाहीत, तर त्वचेचं पोषण करण्यासही मदत करतात.


डार्क चॉकलेट वॅक्सचे फायदे

डार्क चॉकलेट वॅक्सचे तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत-


1.हे वॅक्स तुमच्या त्वचेचे पोषण आणि केस काढून टाकते, जेणेकरून नंतर तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसत नाही. 
2.या वॅक्सचा एक फायदा असा आहे की ते कोरडी आणि तेलकट त्वचा असलेल्या महिलाही सहजपणे वापरु शकतात.
त्यात काही आवश्यक तेल घटक देखील असतात, जे तुमच्या त्वचेला सुदिंग इफेक्ट देतात.
3.जर तुम्हाला वॅक्सिंग करताना कमी त्रास हवा असेल तर तुम्ही याचा पर्याय निवडू शकता.
4. टॅनिंग काढण्यासाठी डार्क चॉकलेट हा उत्तम पर्याय मानला जातो.


व्हाईट चॉकलेट वॅक्स

व्हाईट चॉकलेट वॅक्स सामान्यतः सलूनमध्ये लिपोसोल्युबल वॅक्स किंवारिका वॅक्स या नावाने वापरला जातो. हे व्हेजिटेबल ऑईल, बीसवॅक्स आणि ग्लिसरील रोझिनेट यांचे मिश्रण आहे. सामान्यतः, अनेक प्रकारच्या वॅक्समध्ये कोलोफोनी असते, ज्यामुळे काही ऍलर्जी होऊ शकते. परंतु पांढऱ्या चॉकलेट वॅक्समध्ये ते आढळत नाही. त्यामुळे ते त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

व्हाईट चॉकलेट वॅक्सचे फायदे

डार्क चॉकलेट वॅक्सप्रमाणेच व्हाईट चॉकलेट वॅक्सचेही स्वतःचे काही फायदे आहेत-

1.त्यात व्हेजिटेबल ऑईल आणि ग्लिसरील रोझिनेट असल्याने, या वॅक्सिंग दरम्यान तुम्हाला खूप कमी वेदना होते.
2.या वॅक्सला प्री-हीटिंगची गरज नसते, त्यामुळे त्वचा जळण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता नसते.
3.जर तुम्हाला वाढलेल्या केसांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर हे वॅक्स त्यावर खूप चांगले काम करते.
4.जर तुमची त्वचा सेन्सेटिव्ह असेल, तर व्हाईट चॉकलेट वॅक्स वापरणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.
5.व्हाईट चॉकलेट वॅक्समध्ये असलेले मेण त्वचेला खोल पोषण देते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी