Ex-boyfriend in dreams: एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात येतो? जाणून घ्या हे कसले संकेत

लाइफफंडा
Updated Jan 06, 2020 | 16:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Dreams of Ex-boyfriend: अनेकदा असं होतं की, आपण आपल्या करंट पार्टनरसोबत खूप आनंदी आयुष्य जगत असतो, मात्र तेव्हाच अचानक आपल्या स्वप्नात एक्स-बॉयफ्रेंड आला तर... जाणून घ्या या स्वप्नामागचे कारण आणि त्याचा अर्थ...

Reasons why are you dreaming about your Ex boyfriend
एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात येतो? जाणून घ्या हे कशाचे संकेत   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • एक्स बॉयफ्रेंड स्वप्नात येण्यामागचं कारण
  • अशा स्वप्नांचे निघतात अनेक अर्थ
  • स्वप्नांवर नसतो आपला कंट्रोल

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिच्यासोबत आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगू शकू, असं वाटत असतं. आयुष्याच्या अनेक वळणांवर आपल्याला असे लोक मिळतात, जे आपल्याला आवडतात. त्याच्यासोबत वेळ घालवणं आपल्याला आवडत असतं. मात्र बरेचदा अनेक कारणांमुळे हे नातं पुढे जावू शकत नाही आणि ब्रेकअप होऊन प्रत्येक जण पुढे जातो.

मूव्ह ऑन करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं, मात्र प्रत्येकजण आपल्या ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा पूरेपूर प्रयत्न करत असतात. आपण सुद्धा आपल्या बॉयफ्रेंडला विसरून पुढील आयुष्य जगू लागतात. मात्र आपण आनंदी आयुष्य जगत असतांना अचानक आपल्या स्वप्नात तो एक्स बॉयफ्रेंड आला तर? हो या स्वप्नाचे अनेक कारणं असू शकतात. काही तरुणींसोबत असं होतं की, त्या आपल्या करंट पार्टनरसोबत खूप आनंदी असतात, पण तरीही त्यांना स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड दिसतो. जाणून घ्या असं का होतं...

नात्याचा दु:खद अंत

प्रत्येकच नात्याचा शेवट हा त्रास देणारा असतो. आपल्या पार्टनरनं जर विश्वासघात केला असेल तर त्याचा मनावर खूप खोल परिणाम होतो. तरीही आपल्या स्वप्नात नेहमी तो येत असतो. ही सामान्य बाब आहे, याबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही.

काही अर्धवट राहिलं असेल तर

नात्यामध्ये दोघंही एकमेकांना पूरक ठरत असतात. मात्र ब्रेकअपनंतर आपल्याजवळील गोष्टी शेअर करण्यासाठी तो व्यक्ती सोबत नसतो. अशामध्ये आपल्याला अर्धवट वाटत राहतं. तसं तर आपल्यासोबत आपला करंट पार्टनर असतो, पण तरीही काहीतरी अर्धवट असल्याचं आपल्याला जाणवत राहतं आणि एक्स-बॉयफ्रेंडची आठवण येते.

घालवलेले चांगले क्षण

ब्रेकअपचा अर्थ असा नाही की आपण त्या व्यक्तीसोबत चांगले क्षण घालवले नसतील. रिलेशनशीपमध्ये असे अनेक क्षण असतात जे आपल्याला त्या व्यक्तीशी जोडून ठेवतात. त्याच चांगल्या आठवणी आपल्या मनात घर करून असतात, त्यामुळे अनेकदा स्वप्नात त्या दिसतात.

करंट आणि एक्स पार्टनरमध्ये काही साम्य असेल तर

तसा तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो, मात्र अनेकदा काही सवयी दोन लोकांमध्ये एकसारख्या असतात. सवयींसोबतच राहणीमान, ड्रेसिंग, हेअरस्टाईल सारख्या गोष्टी दोघांमध्ये सारख्या असतात. जर आपल्या करंट आणि एक्स बॉयफ्रेंडमध्ये असं काही साम्य असेल तर त्यामुळेही एक्स बॉयफ्रेंडची आठवण येऊ शकते. स्वप्नात आपण एक्स बॉयफ्रेंडला बघू शकता.

काही जुन्या गोष्टी आठवल्या तर

आपण एक्स बॉयफ्रेंडसोबत जो वेळ घालवला असतो, तसंच काही जर आपल्यासोबत पुन्हा घडलं, तर जुन्या आठवणी ताज्या होतात. जसं की आपण त्याच जागी गेलात जिथं एक्स बॉयफ्रेंडसोबत जात असाल, तर आपल्याला जुनं सर्व आठवू लागेल. अशा गोष्टी मनात राहिल्या की त्या मग स्वप्नात दिसतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...