Women Attraction : पुरुषांच्या कोणत्या गोष्टी पाहून महिला होत असतात आकर्षित; कोणती गोष्ट बायकांना आवडते

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 20, 2023 | 18:27 IST

महिला ह्या पुरुषांना पहिल्यावेळीच पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या प्रेमात (love)पडत असतात. पण आपण याला लॉ ऑफ अट्रॅक्शन  (Law of Attraction) म्हणू  शकतो का? पुरुषांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या महिलांना आकर्षित करत असतात. दरम्यान या विषयावर अनेक संशोधन झाली आहेत. या संशोधनात पुरुषांची कोणती गोष्ट आहे, ज्या महिलांना खूप आवडत असतात, त्यामुळे त्या पुरुषांकडे आकर्षित होत असतात.

What things in men attract women?
पुरुषांच्या कोणत्या गोष्टींमुळे महिला होत असतात आकर्षित  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • पुरुष पायी किंवा सायकलवर चालत असले तरी स्त्रियांना ते भावत असतात.
  • वयाने मोठे असलेल्या पुरुषांना प्रेम संबंधातील अनुभव असतो.
  • महिलांना विनोदबुद्धी असलेले पुरुष देखील आवडत असतात.

मुंबई :  पुरुष (men) महिलांकडे (women) अधिक आकर्षित होत असतात, असं म्हटलं जातं. परंतु  बहुदा अनेक महिला ह्या पुरुषांना पहिल्यावेळीच पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या प्रेमात (love)पडत असतात. पण आपण याला लॉ ऑफ अट्रॅक्शन  (Law of Attraction) म्हणू  शकतो का? पुरुषांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या महिलांना आकर्षित करत असतात. दरम्यान या विषयावर अनेक संशोधन झाली आहेत. या संशोधनात पुरुषांची कोणती गोष्ट आहे, ज्या महिलांना खूप आवडत असतात, त्यामुळे त्या पुरुषांकडे आकर्षित होत असतात. (What things in men attract women; What do women like about men?)

अधिक वाचा  :लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

रुटर विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ आणि बेस्ट सेलिंग लेखक हेलेन ई फिशर यांच्यामतानुसार, जगातील महिला या अभिव्यक्तीवर आधारित आपली आवड दर्शवत असतात. जबरदस्ती करणारे पुरूष महिलांना आवडत नाहीत. जे पुरुष त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात किंवा त्यांना समजून घेतात, त्यांना बोलण्याची आणि मते मांडण्यास संधी देतात, अशी पुरुष स्त्रियांना आवडतात. आधी असा समज होता की, महागडे कपडे घालणारे आणि आलिशान वाहने चालवणारे पुरुषच स्त्रियांची पसंती बनतात, परंतु हे दिवस गेले आहेत. 

पुरुष पायी किंवा सायकलवर चालत असले तरी स्त्रियांना ते भावत असतात. पुरुषांचे व्यक्तित्व हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. फक्त तुमच्या व्यक्तिमत्वात अशी एक गोष्ट असावी जी त्यांना भुरळ घालेल. तो तुमचा निरागस चेहराही असू शकतो. अर्थात तुम्ही साधे कपडे घातले तरी स्त्रिया पुरुषांवर प्रेम करत असतात. परंतु तुमची वागणूक ही चांगली असली पाहिजे. 

अधिक वाचा  : व्हॅलेंटाईन डेला पहिली डेट करत असाल विचारा थेट हे प्रश्न

यासंबंधी 2010 करण्यात आलेल्या एक संशोधनानुसार, महिलांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आवडत असते. हे संशोधन 3 हजार 770 विविध वयोगटातील महिलांवर करण्यात आले होते.  लेखक आणि डंडीच्या मनोवैज्ञानिक विद्यापीठातील फियोना मूर यांच्यामते ज्या महिला आर्थिक स्थितीने सक्षम झाल्या आहेत, त्यांना शक्तीशाली आणि मोठ्या वयाचे पुरुष आवडत असतात. वयाने मोठे असलेल्या पुरुषांना प्रेम संबंधातील अनुभव असतो. त्यामुळे हे पुरुष स्त्रियांचे मुख्य  आकर्षण असतात. तसेच वाढलेल्या वयामुळे पुरुषांमध्ये आत्मविश्वास आणि व्यक्तीमत्त्व वाढलेलं असतं, तसेच त्यांच्यात समजदारपणा आलेला असतो, त्यामुळे हे पुरुष स्त्रियांना खूप आवडत असतात. 

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार, महिलांना स्वच्छ चेहरा म्हणजेच क्लीन सेव्ह, साधरण दाढी, किंवा पूर्ण दाढी असणारी पुरुष आवडत असतात. यावर महिलांनी आपलं मत नोंदवलं आहे, हा अभ्यास 2013 साली करण्यात आला होता. या संशोधनातील महिला म्हणाल्या की, सर्वाधिक आकर्षक पुरुष हे हलकी दाढी असणारे होते. याचप्रमाणे महिलांना दयाळू आणि सभ्य पुरुष आवडतात.

जे महिलांशी विनम्र वागतात  आणि त्यांची काळजी घेणारे असे पुरुष नेहमीच स्त्रियांना आवडतात. सहसा अशा पुरुषांचा स्वभाव स्त्रियांच्या हृदयाला स्पर्श करत असतो. या पुरुषांविषयी महिलांच्या मनात नेहमीच आदर आणि जागा असते. त्याचबरोबर महिलांना विनोदबुद्धी असलेले पुरुष देखील आवडत असतात. जे स्त्रियांना हसवू शकतील. महिलांना हसवणारे पुरुष केवळ चैतन्यशील दिसत नाहीत तर जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे असतात, त्यामुळे स्त्रियांना हे पुरुष खूप आवडत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी