Today in History : Friday, 20 May 2022 : दिनविशेष : शुक्रवार २०, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज शुक्रवार २० मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History Friday, 20  may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 

२० मे जन्म - 

 1. १९५२: रॉजर मिला - कॅमेरुनचा फूटबॉलपटू
 2. १९१५: मोशे दायान - इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (निधन: १६ ऑक्टोबर १९८१)
 3. १८५०: विष्णूशास्त्री चिपळूणकर - आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक (निधन: १७ मार्च १८८२)
 4. १८१८: विल्यम फार्गो - अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ३ ऑगस्ट १८८१)
 5. १९००: सुमित्रानंदन पंत - हिंदी कवी (निधन: २८ डिसेंबर १९७७)
 6. १८८४: लिओन स्चलिंगर - वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक (निधन: २५ डिसेंबर १९४९)
 7. १८६०: एडवर्ड बकनर - आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १३ ऑगस्ट १९१७)
 8. १८८४: पांडुरंग दामोदर गुणे - प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (निधन: २५ नोव्हेंबर १९२२)
 9. १९४४: डीट्रिख मत्थेकित्झ - रेड बुलचे सहसंस्थापक
 10. १९१३: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट - हेव्हलेट-पॅकार्डचे सहसंस्थापक (निधन: १२ जानेवारी २००१)
 11. १८५१: एमिल बर्लिनर - ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक (निधन: ३ ऑगस्ट १९२९)


२० मे - घटना

 1. ५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
 2. १९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
 3. १४९८: पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.
 4. १९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
 5. १८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
 6. १८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोपचे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
 7. २००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
 8. २०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
 9. १९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.
 10. १५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक ऍटलास प्रकाशित केला.

२० मे निधन - दिनविशेष

 1. १९९२: डॉ. लीला मूळगांवकर - सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
 2. १९९७: माणिकराव लोटलीकर - इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
 3. १५०६: ख्रिस्तोफर कोलंबस - इटालियन दर्यावर्दी वव संशोधक
 4. १९३२: बिपिन चंद्र पाल - स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
 5. १९५७: तांगुतरी प्रकाशम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २३ ऑगस्ट १८७२)
 6. १९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी - आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: २८ जुलै १९०९)
 7. २०१२: यूजीन पॉली - रिमोट कंट्रोलचे शोधक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)
 8. १९६१: विष्णूपंत चितळे - कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई
 9. १८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर - समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान
 10. १५७१: केशवचैतन्य - संत तुकारामांचे गुरु

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी