Today in History: Monday 11th july 2022: दिनविशेष: सोमवार, ११ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history 11th july 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज सोमवार, ११ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Monday 11th  July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

११ जुलै - दिनविशेष

 1. २०२१: रिचर्ड ब्रॅन्सन - हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.
 2. २००६: मुंबई बॉम्बस्फोट - मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत किमान २०९ लोकांचे निधन तर ७१४ लोक जखमी झाले.
 3. २००६: मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट - भारतात मुंबई येथे झालेल्या लोकक ट्रेनच्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेत २०९ लोकांचे निधन.
 4. २००१: भारतातील आगरताळा ते बांगलादेश मधील ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
 5. १९७९: स्कायलॅब - हे अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक हिंदी महासागरावरील पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश असताना अपघातात नष्ट.
 6. १९७८: लॉस अल्फाक आपत्ती - घातक द्रव वायू वाहून नेणारा ट्रकच्या अपघातामुळे स्पेन मधील २१६ पर्यटकांचे निधन.
 7. १९७७: मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर - यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले.
 8. १९७३: व्हेरिग फ्लाइट ८२० च्या अपघातात १२३ लोकांचे निधन, त्यामुळे विमानाच्या शौचालयात धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली.
 9. १९७१: चिली - देशातील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
 10. १९६२: पहिले ट्रान्सअटलांटिक उपग्रह दूरदर्शन प्रसारण झाले.
 11. १९६२: प्रोजेक्ट अपोलो - नासाने चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याचे आणि त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची घोषणा केली.
 12. १९५५: अमेरिका - अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.
 13. १९५०: पाकिस्तान - आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
 14. १९४३: दुसरे महायुद्ध - सिसिलीवर मित्र राष्ट्रांचे आक्रमण.
 15. १९४०: दुसरे महायुद्ध - विची फ्रान्स राजवट औपचारिकपणे स्थापन झाली.
 16. १९२१: मंगोलियन पीपल्स रिपब्लिक - स्थापना.
 17. १९१९: नेदरलँड - देशामध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
 18. १९०८: लोकमान्य टिळक - यांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
 19. १८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
 20. १८०१: पॉन धूमकेतू - फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉनयांनी या धूमकेतूचा शोध लावला.

११ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९६७: झुम्पा लाहिरी - भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक
 2. १९५६: अमिताव घोष - भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक
 3. १९५३: सुरेश प्रभू - भारतीय राजकारणी
 4. १९३४: जियोर्जियो अरमानी - जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक
 5. १९२७: थिओडोर हेरॉल्ड मॅमन - लेसरचे निर्माते (निधन: ५ मे २००७)
 6. १९२३: टुण टुण - भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन (निधन: २४ नोव्हेंबर २००३)
 7. १९२१: शंकरराव खरात - दलित साहित्यिक (निधन: ९ एप्रिल २००१)
 8. १८९१: परशुराम कृष्णा गोडे - प्राच्यविद्या संशोधक (निधन: २८ मे १९६१)
 9. १८८९: नारायण हरी आपटे - कादंबरीकार, चित्रपट कथालेखक (निधन: १४ नोव्हेंबर १९७१)

११ जुलै निधन - दिनविशेष

 1. २००९: शांताराम नांदगावकर - गीतकार (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
 2. २००३: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)
 3. १९९४: मेजर रामराव राघोबा राणे - बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी - परमवीर चक्र
 4. १९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये - ब्रिटिश अभिनेते, दिग्दर्शक निर्माते (जन्म: २२ मे १९०७)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी