Today in History: Thursday, 13th June 2022 : दिनविशेष : सोमवार, १३ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज सोमवार,१३ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Monday, 13th June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 


१३ जून घटना - दिनविशेष

 1. २०००: विश्वनाथन आनंद - स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
 2. १९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
 3. १९८३: पायोनियर १० - हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
 4. १९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
 5. १९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
 6. १९४४: दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
 7. १९३४: व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
 8. १८८६: कॅनडा - देशातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

१३ जून जन्म - दिनविशेष

 1. १९६५: मनिंदर सिंग - भारतीय क्रिकेटपटू
 2. १९३७: आंद्रेस व्हिटॅम स्मिथ - द इंडिपेंडंटचे सहसंस्थापक
 3. १९२८: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर - अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २३ मे २०१५)
 4. १९२३: प्रेम धवन - गीतकार - पद्मश्री (निधन: ७ मे २००१)
 5. १९०९: इ. एम. एस. नंबूदिरिपाद - केरळचे १ले मुख्यमंत्री (निधन: १९ मार्च १९९८)
 6. १९०५: कुमार श्री दुलीपसिंहजी - इंग्लंडचे क्रिकेटपटू (निधन: ५ डिसेंबर १९५९)
 7. १८७९: बाबाराव सावरकर - अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (निधन: १६ मार्च १९४५)
 8. १८३१: जेम्सक्लार्क मॅक्सवेल - प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ (निधन: ५ नोव्हेंबर १८७९)
 9. १८२२: कार्ल श्मिट - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ११ मार्च १८९४)


१३ जून निधन - दिनविशेष

 1. २०२०: वसंत नायसादराय रायजी - भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (जन्म: २६ जानेवारी १९२०)
 2. २०१३: डेव्हिड ड्यूईश - ड्यूईश इंक. कंपनीचे संस्थापक
 3. २०१२: मेहदी हसन - पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (जन्म: १८ जुलै १९२७)
 4. १९६९: आचार्य अत्रे - मराठी विनोदी लेखक (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
 5. १९६९: प्रल्हाद केशव अत्रे - विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
 6. १९६७: विनायक पांडुरंग करमरकर - शिल्पकार - पद्मश्री (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी