Today in History: Sunday 10th july  2022: दिनविशेष: रविवार,१० जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज रविवार,१० जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Sunday 10th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१० जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९५०: बेगम परवीन सुलताना - पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका - पद्म भूषण, पद्मश्री
 2. १९४९: सुनील गावसकर - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक - पद्म भूषण
 3. १९४५: व्हर्जिनिया वेड - इंग्लिश टेनिस खेळाडू
 4. १९४३: आर्थर ऍश - अमेरिकन टेनिस खेळाडू (निधन: ६ फेब्रुवारी १९९३)
 5. १९४३: आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (निधन: ६ फेब्रुवारी १९९३)
 6. १९४०: लॉर्ड मेघनाद देसाई - अर्थशास्त्रज्ञ
 7. १९३४: रजनीकांत आरोळे - जामखेड मॉडेलचे जनक - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २६ मे २०११)
 8. १९२३: जी. ए. कुळकर्णी - लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९८७)
 9. १९२१: हार्वे बॉल - स्माईलीचे जनक (निधन: १२ एप्रिल २००१)
 10. १९१४: जो शस्टर - सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते (निधन: ३० जुलै १९९२)
 11. १९१३: पद्मा गोळे - कवयित्री (निधन: १२ फेब्रुवारी १९९८)
 12. १९०३: रा. भि. जोशी - साहित्यिक

१० जुलै - दिनविशेष

 1. २०२२: मलेशिया - देशातील अनिवार्य फाशीची शिक्षा रद्द केली जाईल अशी घोषणा.
 2. २०००: नायजेरिया - देशातील फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन २५० कामगारांचे जळुन निधन.
 3. १९९५: आंग सान सू क्यी - म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
 4. १९९२: विक्रम इनसॅट भू-केंद्र - राष्ट्राला अर्पण केले.
 5. १९७८: महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई - स्थापना झाली.
 6. १९७३: बांगलादेश - देशाला पाकिस्तानच्या संसदेने मान्यता दिली.
 7. १९६२: टेलस्टार-१ - हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
 8. १९४७: मुहम्मद अली जिना - पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.
 9. १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन - हवाईयुद्ध सुरू झाले.
 10. १९२५: अवतार मेहेरबाबा - यांनी मौनव्रताची सुरुवात केली, त्यांनी सलग ४४ वर्षे हे व्रत निधनापर्यंत पाळले.
 11. १९२३: इटली - मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
 12. १९१३: सर्वोच्च तापमान - कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
 13. १८९०: अमेरिका - वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

१० जुलै निधन - दिनविशेष 

 1. २०२०: आनंद मोहन चक्रबर्ती - भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (जन्म: ४ एप्रिल १९३८)
 2. २०१३: गोकुलानंद महापात्रा - भारतीय लेखक आणि शैक्षणिक (जन्म: २१ मे १९२२)
 3. २००५: जयवंत कुलकर्णी - पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)
 4. २०००: वक्कम मजीद - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २० डिसेंबर १९०९)
 5. १९९५: डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर - गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध
 6. १९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे - साम्यवादी विचारवंत साहित्यिक
 7. १९७०: ब्यार्नी बेनेडिक्ट्सन - आईसलँडचे १३वे पंतप्रधान
 8. १९६९: डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर - इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)
 9. १५५९: हेन्री (दुसरा) - फ्रान्सचा राजा (जन्म: ३१ मार्च १५१९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी