Today in History : Thursday, 9th June 2022 : दिनविशेष : गुरूवार, ९ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज गुरूवार, ९ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Thursday, 9th June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 

 

९ जून जन्म - दिनविशेष

 1. १९८१: अनुष्का शंकर - भारतीय-इंग्लिश सतार वादक आणि संगीतकार
 2. १९७७: अमिशा पटेल - भारतीय अभिनेत्री
 3. १९७५: अँड्र्यू सायमंड्स - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (निधन: १४ मे २०२२)
 4. १९४९: किरण बेदी - भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी
 5. १९३१: नंदिनी सत्पथी - भारतीय लेखक व राजकारणी (निधन: ४ ऑगस्ट २००६)
 6. १९१२: वसंत देसाई - संगीतकार (निधन: २२ डिसेंबर १९७५)
 7. १८४५: गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड - भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल (निधन: १ मार्च १९१४)

९ जून घटना - दिनविशेष

 1. २००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
 2. २००६: फुटबॉल विश्वकप - १८वी फुटबॉल विश्वकप स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
 3. २००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
 4. १९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
 5. १९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
 6. १९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
 7. १९७०: ऍनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
 8. १९६४: लाल बहादुर शास्त्री - यांनी भारताचे २रे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
 9. १९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
 10. १९३४: डोनाल्ड डक - कार्टून पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.
 11. १९३१: रॉबर्ट गोडार्ड - यांनी अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचे पेटंट मिळाले.
 12. १९२३: बल्गेरिया - देशात लष्करी उठाव झाला.
 13. १९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर - यांचे लंडनला प्रयाण.
 14. १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालय - स्थापना.
 15. १७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
 16. १६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना पुत्र झाला. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.


९ जून निधन 

 1. ६८: नीरो - रोमन सम्राट (जन्म: १५ डिसेंबर ३७)
 2. २०११: मकबूल फिदा हुसेन - चित्रकार व दिग्दर्शक (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)
 3. १९९५: एन. जी. रंगा - स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते (जन्म: ७ नोव्हेंबर १९००)
 4. १९९३: सत्येन बोस - बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: २२ जानेवारी १९१६)
 5. १९८८: गणेश भास्कर अभ्यंकर - अभिनेते
 6. १९८२: मिर्झा नासीर अहमद - भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु (जन्म: १६ नोव्हेंबर १९०९)
 7. १९४६: राम (सातवा) - थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा (जन्म: २० सप्टेंबर १९२५)
 8. १९००: बिरसा मुंडा - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
 9. १८७०: चार्ल्स डिकन्स - इंग्लिश कादंबरीकार व लेखक (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)
 10. १८३४: पं. विल्यम केरी - अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)
 11. १७१६: बंदा सिंग बहादूर - शीख सेनापती (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी