Today in History Wednesday 11 May 2022 : दिनविशेष : बुधवार, ११ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

11 may today in history
बुधवार, ११ मे २०२२ दिनविशेष 
थोडं पण कामाचं
  • आज ११ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

११ मे रोजी झालेले जन्म

१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.
१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)
१९१८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)
१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)
१९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९)
१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

११ मे रोजी झालेले मृत्यू

२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)
१८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)
१८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७९२)


११ मे रोजी झालेल्या ऐतिहासिक घटना

१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)
१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१९४९: इस्राएल देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश.
१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या. या दिवसाची आठवण म्हणून देशात तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा होतो. 
१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे अपघाती निधन.
१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील एक हजारवा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी