Today in History: Wednesday, 25 May 2022: दिनविशेष: बुधवार २५, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविषेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज बुधवार २५ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Wednesday, 25 May 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

२५ मे - जन्म

  1. १९७२: करण जोहर - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
  2. १९२७: रॉबर्ट लुडलुम - अमेरिकन लेखक (निधन: १२ मार्च २००१)
  3. १८९९: काझी नझरुल इस्लाम - क्रांतिकारक आणि बंगाली कवी - पद्म भूषण (निधन: २९ ऑगस्ट १९७६)
  4. १८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर - इतिहासकार व लेखक (निधन: २८ नोव्हेंबर १९६३)
  5. १८८६: रास बिहारी बोस - क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९४५)
  6. १८३१: सर जॉन इलियट - ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (निधन: १८ मार्च १९०८)

२५ मे - दिनविशेष

  1. २०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
  2. २०११: द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
  3. १९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
  4. १९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  5. १९८५: बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
  6. १९८१: सौदी अरेबियातील रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
  7. १९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
  8. १९६३: इथिओपियातील आदिसाबाबा ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापना झाली.
  9. १९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
  10. १९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.

२५ मे निधन - दिनविशेष

  1. २०१३: नंद कुमार पटेल - भारतीय राजकारणी (जन्म: ८ नोव्हेंबर १९५३)
  2. २०१३: महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ५ ऑगस्ट १९५०)
  3. २००५: सुनील दत्त - अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री (जन्म: ६ जून १९२९)
  4. २००५: इस्माईल मर्चंट - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (जन्म: २५ डिसेंबर १९३६)
  5. १९९८: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
  6. १९५४: गजान माणिकराव - आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी