Today in History : Wednesday,  2nd June 2022 : दिनविशेष : बुधवार, २ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज बुधवार, २ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Wednesday, 2nd June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

२ जून - दिनविशेष

 1. २०१४: तेलंगणा - भारताचे २९वे राज्य झाले.
 2. २०००: अमृता प्रीतम - यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.
 3. १९९९: भूतान - देशामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
 4. १९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) - यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
 5. १९५३: राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांचा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक.
 6. १९४९: दक्षिण आफ्रिका - देशामध्ये उच्च्वर्णीय लोकांना सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
 7. १९४६: इटली - देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
 8. १८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
 9. १८९६: गुग्लियेमो मार्कोनी - यांना रेडिओचे पेटंट मिळाले.
 10. १८००: कॅनडा - देशात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

२ जून जन्म 

 1. १९७४: गाटा काम्स्की - अमेरिकन बुद्धीबळपटू
 2. १९६५: मार्क वॉ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
 3. १९६५: स्टीव्ह वॉ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
 4. १९६३: आनंद अभ्यंकर - अभिनेते (निधन: २३ डिसेंबर २०१२)
 5. १९५५: नंदन निलेकणी - इन्फोसिसचे सहसंस्थापक - पद्म भूषण
 6. १९५५: मणि रत्नम - चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री
 7. १९४३: इलय्या राजा - भारतीय संगीतकार
 8. १९३०: पीट कॉनराड - अमेरिकन अंतराळवीर
 9. १९०७: विष्णू विनायक बोकील - मराठी नाटककार आणि लेखक
 10. १७३१: मार्था वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी (निधन: २२ मे १८०२)


२ जून निधन 

 1. २०१४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी - भारतीय कार्डिनल (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)
 2. १९९०: श्रीराम शर्मा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते (जन्म: २० सप्टेंबर १९११)
 3. १९९०: सर रेक्स हॅरिसन - हॉलिवूड अभिनेते (जन्म: ५ मार्च १९०८)
 4. १९८८: राज कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९२४)
 5. १९७५: देवेन्द्र मोहन बोस - वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)
 6. १९७०: ब्रुस मॅक्लारेन - मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १९३७)
 7. १८८२: ज्युसेप्पे गॅरिबाल्डी - इटलीचा क्रांतिकारी (जन्म: ४ जुलै १८०७)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी