दूध पितेवेळी हे पदार्थ खाणे टाळावे,आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम 

दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते.परंतु, त्यासोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर, ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

what we shouldn't eat with milk to be healthy
दूध पितेवेळी हे पदार्थ खाणे टाळावे,आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दूधासोबत मांसाहारी पदार्थ कधीच खाऊ नयेत
  •    याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात
  •    याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात

दररोज दूध पिल्याने आपल्या शरिराला अनेक पोषक गोष्टी एकदाच मिळतात. दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, कॅल्शिअम, मिनरल्स आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. परंतु, आपण जर दुधासोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर ते जितकं फायदेशीर तितकंच अपायकारकही ठरू शकतं. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर, या लेखातून ते समजून घेऊ.  

दुधासोबत खाऊ नयेत हे पदार्थ: 

  1.  ब्रेड-बटर: अनेक घरांमध्ये नाष्ट्यासाठी ब्रेड-बटरचा उपयोग केला जातो. परंतु, त्यासोबत दूध पिल्यास ते अपायकारक ठरू शकते. हे एकत्र खाल्ल्याने उलटीसारख्या समस्याही उद्भवू शकतात. 
  2. संत्री: दुधात असलेले कॅल्शिअम फळातील पोषक द्रव्य शोषूण घेतात. यामुळे, त्या फळाचा फायदा होत नाही. दुधासोबत संत्री खाल्ली तर पोटात गॅसेसचा त्रास संभवतो. संत्र्याव्यतिरिक्त दही, अंडी, मांस आणि मासेसुद्धा खाणे टाळावे. 
  3.  मुळा: दूध पितेवेळी मुळा कधीच खाऊ नये. याने त्वचारोग उद्भवतात. यापासून वाचायचे असेल तर, दुधासोबत मुळा खाणे टाळावे. 
  4.  तिखट पदार्थ: दूध पील्यावर तिखट पदार्थ कदापि खाऊ नयेत. याने अपचनासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी