Maldives मध्ये असं काय आहे खास?, की सेलिब्रिटी सारखे तिकडेच जातात... 

लाइफफंडा
रोहित गोळे
Updated Nov 23, 2020 | 17:38 IST

Maldives: बॉलिवूडमधील बरेच सेलेब्रिटी मालदीवच्या सहलीला गेलेले आहेत. जाणून घ्या सेलिब्रिटींचं हे आवडीचं ठिकाण का आहे. 

Maldives
Maldives मध्ये असं काय आहे खास?, की सेलिब्रिटी सारखे तिकडेच जातात...   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मालदीव 1200 लहान बेटांनी बनलेला देश आहे
  • सेलिब्रिटींचं सुट्टी एन्जॉय करण्याचं आवडतं ठिकाण म्हणजे मालदीव
  • जाणून घ्या मालदीव का आहे इतकं खास

मुंबईः आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहत असाल की अनेक सेलिब्रिटी हे आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवची निवड करतात. अनेक सेलिब्रटी कपल हे हनिमूनसाठी देखील मालदीवचीच निवड करतात. त्यामुळे बर्‍याच चाहत्यांच्या मनात असा प्रश्न येतो की, हे सेलेब्रिटी बऱ्याचदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवचीच का निवड करतात? 

नुकतंच अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे नुकतेच मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. अभिनेत्री रकुल प्रीतसुद्धा सुंदर बेटांनी बनलेल्या या देशात फिरण्यासाठी गेली आहे. याशिवाय नुकतंच फरहान अख्तरने देखील मालदीवचे फोटो शेअर केले होते, तसेच वरुण धवन, मौनी रॉय, तापसी पन्नू हे देखील मालदीवमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या अगोदरही बरेच सेलिब्रिटी हे वेळोवेळी येथे सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. 

अशा परिस्थितीत बऱ्याच चाहत्यांच्या मनात हा प्रश्न देखील येऊ शकतो की, मालदीवमध्ये असे काय खास आहे की  बॉलिवूड सेलिब्रिटींचे ते सर्वात आवडते ठिकाण आहे.

१. सर्वप्रथम, सध्या कोविड-१९ साथीच्या दरम्यान मालदीवचा प्रवास हा खूप सोपा समजला जात आहे. हिंद महासागर प्रदेशातील बेटांच्या या देशात जाण्यापूर्वी ७२ तास आधी केलेल्या चाचणीचे प्रमाणपत्र घेऊन येथे जाऊ शकतं. फक्त या प्रमाणपत्रात चाचणी प्रयोगशाळेचे नाव आणि पत्ता प्रविष्ट केला गेलेला असणं गरजेचं आहे.

२. मालदीवचा प्रवास सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने शक्य आहे आणि इथे राहण्यासाठी बर्‍याच स्तरांवर आकर्षक सुविधा आहेत. तसेच पर्यटक येथील विविध उपक्रमांचा एक भाग बनू शकतात.

३. जगातील सर्वात सुंदर रिसॉर्ट्स आणि हॉटेल मालदीवमध्ये आहेत आणि समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्यही मनमोहक आहेत. इथे वॉटर व्हिला देखील आहेत जिथे आपण काचेच्या बनलेल्या खोलीत पाण्याखाली राहण्याचा आनंद घेऊ शकता.

४. मर्यादित बजेट असलेल्या लोकांना स्वस्त किंमतीतील गेस्ट हाऊस देखील येथे आहेत. येथील सीफूड देखील लोकांना आकर्षित करते. इथल्या वैशिष्ट्यांमध्ये मालदीव स्पेशल चॉकलेटचा देखील समावेश आहे.

१२०० लहान बेटे असलेला देश: मालदीव हा १२०० लहान बेटांनी बनलेला देश आहे. ज्यामध्ये फक्त २०० बेटांवरच लोकं राहतात. यापैकी ५० बेटांवर पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक बेटाचे स्वतःचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य आहे. ५०  बेटांपैकी ३० गेस्ट हाऊस असणारं माफुसी बेट बरेच प्रसिद्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी