मुंबई: व्हॅलेंटाईन वीक सुरू असून कपल्समध्ये याचा उत्साहही पाहायला मिळत आहे. व्हॅलेंटाईन वीक हा असा वर्षातील एक आठवडा असतो ज्याच्या प्रत्येक दिवशी प्रेम व्यक्त केले जाते. व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाच्या आठवड्यातील चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. टेडी डे दरवर्षी १० फेब्रुवारीला साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवस तरूणाईसाठी खूप खास असतो मात्र टेडी डेच्या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी देत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. कपल्सशिवाय मित्रही एकमेकांना टेडी देतात असा हा दिवस असतो.
टेडी डेच्या दिवशी एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडी दिली जाण्याची पद्धत आहे. मात्रभावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही टेडी व्यतिरिक्त शुभेच्छा देणारे व्हॉट्सअॅप फोटो पाठवू शकता.