Anti-Terrorism Day 2022: कधी आणि कसा सुरू झाला दहशतवाद विरोधी दिवस? जाणून घ्या यामागची कहाणी

लाइफफंडा
Updated May 21, 2022 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anti-Terrorism Day 2022 । भारतात दरवर्षी २१ मे रोजी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, दहशतवाद कमी करणे आणि सर्व जाती, पंथ इत्यादी लोकांमध्ये एकता वाढवणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

When and how did the anti-terrorism day begin
कधी आणि कसा सुरू झाला दहशतवाद विरोधी दिवस?, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात दरवर्षी २१ मे रोजी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो.
  • ३१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती.
  • हत्येनंतर वी.पी सिंह सरकारने २१ मे ला ॲंटी-टेरिजम डे च्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Anti-Terrorism Day 2022 । मुंबई : भारतात दरवर्षी २१ मे रोजी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, दहशतवाद कमी करणे आणि सर्व जाती, पंथ इत्यादी लोकांमध्ये एकता वाढवणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी दहशतवादामुळे देशाचे किती नुकसान होते, हा संदेश सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो. हा दिवस दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, तरुणांना दहशतवाद आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. (When and how did the anti-terrorism day begin?). 

अधिक वाचा : 'मलिकांचे डी-गँगशी संबंध' आहेत, कोर्टाचं निरीक्षण

भारतात का साजरा केला जातो ॲं​टी-टेरिजम डे? 

दरम्यान, ३१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदुर येथे होते, जिथे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्ब किंवा आत्मघाती बॉम्बचा वापर केला होता.

हत्येनंतर वी.पी सिंह सरकारने २१ मे ला ॲंटी-टेरिजम डे च्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर सार्वजनिक संस्थांमध्ये दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी दहशतवादविरोधी (Anti Terrorism pledge) प्रतिज्ञा घेतली जाते. तसेच या दिवसाचे महत्त्व सांगून डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दहशतवादविरोधी मेसेज पाठवले जातात.

या दिवशी तुम्हीही घ्या ही प्रतिज्ञा 

"आम्ही भारतीय आपल्या देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेवर ठाम विश्वास ठेवतो आणि निष्ठापूर्वक प्रतिज्ञा घेतो की आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात लढू आणि त्याचा सामना करू. आम्ही मानवी जातीच्या सर्व वर्गांमध्ये शांतता, सामाजिक एकोपा आणि समजूतदारपणा राखण्यासाठी आणि मानवी मूल्यांना धोका निर्माण करणाऱ्या विघटनकारी शक्तींविरुद्ध लढण्याची शपथ घेतो."

लक्षणीय बाब म्हणजे भारतात दहशतावादी वारंवार प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात आणि काही वेळा त्यांना यश देखील आले आहे. लोकसभेच्या अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत दहशतवाद्यांनी ३५० हून अधिक वेळा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. २०१८ मध्ये १४३ वेळा, २०१९ मध्ये १३८ वेळा, २०२० मध्ये ९९ वेळा आणि २०२१ मध्ये जवळपास ७७ वेळा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी