Friendship Day 2019: 'या' तारखेला साजरा होणार फ्रेंडशिप डे, जाणून घ्या कशी झाली फ्रेंडशिप डे ची सुरूवात

लाइफफंडा
Updated Jul 30, 2019 | 19:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मित्रांचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे यंदा 4 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली याबाबत अनेक गोष्टी प्रचलित आहेत. मात्र यातील काही किस्से अमर झाले आहेत. पाहा कशी झाली ‘फ्रेंडशिप डे’ची सुरूवात

Frienship Day
येत्या रविवारी आहे फ्रेंडशिप डे, पाहा कशी झाली डे सुरूवात  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो
  • या दिवसाची क्रेझ बहुतेक लहान मुलांमध्ये दिसून येते
  • या दिवसाच्या महत्वाबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत

Friendship Day: फ्रेंडशिप डे, ज्याला मैत्रीचा दिवस म्हणूनही ओळखले जाते. तेरी मेरी यारी.... म्हणत आपल्या मैत्रीची ग्वाही देण्याचा हा दिवस. दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा फ्रेंडशिप डे 4 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं फॅड तसं पाश्चात्यच, पण भारतात हा डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाची क्रेझ बहुतेककरून तरुणांमध्ये जास्त दिसून येते. फ्रेंडशिप डे जवळ येत असल्यानं दुकानंही मस्त सजली आहेत.

लोक आपल्या मित्रांना गिफ्ट्स बरोबर ग्रिटिंग कार्ड्स देऊन फ्रेन्डशिप बॅन्ड बांधून एकमेकांना शुभेच्छा देतात. तसंच जेव्हापासून सोशल नेटवर्किंग साईट्सचा बोलबाला सुरू झाला आहे. तेव्हापासून फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. पण आपण कधी विचार केला आहे का की, या दिवसाचं महत्व काय आहे  किंवा गेल्या किती वर्षांपासून हा दिवस साजरा केला जात आहे? हा दिवस नक्की का साजरा केला जातो?

‘फ्रेंडशिप डे’ची सुरुवात कशी झाली

असं म्हटलं जातं की, फ्रेंडशिप डे अमेरिकन काँग्रेसमध्ये 1935 मध्ये सर्वप्रथम साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून जाहीर करण्यात आला. यानंतर दरवर्षी हा दिवस वार्षिक उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

वर्ल्ड फ्रेंडशिप डे

जागतिक फ्रेंडशिप डे क्रूसेडकडून 30 जुलै 1958 रोजी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर, हा दिवस विधिवत अनेक देशांमध्ये साजरा करण्यात आला. 27 एप्रिल 2011 रोजी, संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीनं दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा केली. वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. कुठे 20 जुलै रोजी साजरा केला जातो तर कुठे 30 जुलै रोजी. परंतू भारतात हा ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

1997 साली प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर 'विन्नी द पूह'ला संयुक्त राष्ट्र संघानं मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय दूत म्हणून निवडलं. फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनच्या 10 वर्षांनंतर प्रसिद्ध बँड बीटल्सनं 1967 साली एक गाणं रिलीज केलं होतं. - With Little Help From My Friends... हे गाणं जगभरात खूप प्रसिद्ध झालं होतं. 

या दिवसाची वाट मित्र संपूर्ण वर्षभर पाहत असतात. हा दिवस त्या खास मित्रांसाठी असतो, जे मित्र आपल्या आयुष्यात प्रत्येक दुनियादारीमध्ये आणि चांगल्या-वाईट काळात आपल्याला साथ देतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी