Father's Day 2022: कधी आणि का साजरा केला जातो फादर्स डे? जाणून घ्या यामागील इतिहास

लाइफफंडा
Updated Jun 15, 2022 | 14:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Father's Day 2022 | आयुष्यात वडीलांचे महत्त्व काय आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आई आपल्याला प्रेम आणि आपुलकी देते, तर वडील जीवनाचा भक्कम पाया मजबूत करतात.

When and why is Father's Day celebrated, Learn the history behind this
कधी आणि का साजरा केला जातो फादर्स डे? वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फादर्स डे दरवर्षी साजरा केला जातो.
  • सर्वप्रथम अमेरिकेत फादर्स डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती.
  • पहिला फादर्स डे १९ जून १९१० रोजी साजरा करण्यात आला.

Father's Day । मुंबई : आयुष्यात वडीलांचे महत्त्व काय आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आई आपल्याला प्रेम आणि आपुलकी देते, तर वडील जीवनाचा भक्कम पाया मजबूत करतात. आई-वडील आपल्या जीवनाची दोन चाकं आहेत त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाची गाडी सुरळीत चालू शकत नाही. यामुळेच दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डेचा इतिहास अनेक वर्षांचा आहे. दरम्यान आज आपण फादर्स डे का साजरा केला जातो आणि यंदा कधी आहे याबाबत जाणून घेणार आहोत. (When and why is Father's Day celebrated, Learn the history behind this). 

अधिक वाचा : या व्यक्तीसमोर स्पायडरमॅन पण झाला फेल, पाहा VIDEO

फादर्स डे चा इतिहास 

माहितीनुसार, सर्वप्रथम अमेरिकेत फादर्स डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. तसेच मागील काही वर्षांपासूनच या दिवसाला भारतातही खूप लोकप्रियता मिळाली आहे. खर तर फादर्स डे पहिल्यांदा यूएसएमध्ये सोनोरा स्मार्ट डॉडने प्रस्तावित केला होता. ती आणि तिच्या पाच भावंडांचे संगोपन त्यांचे वडील दिग्गज विल्यम यांनी केले होते. वडीलांचे कुटुंबावरील प्रेम आणि तळमळ लक्षात घेऊन मदर्स डेच्या धर्तीवर हा दिवस वडीलांना समर्पित करण्यात आला. अखेर जूनच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात आला. पहिला फादर्स डे १९ जून १९१० रोजी साजरा करण्यात आला होता. नंतर १९७२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. 

कधी आहे फादर्स डे 

जगभरात दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. तो जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा १९ जून २०२२ रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस १९१० पासून साजरा करण्यास सुरुवात झाली.

का साजरा केला जातो फादर्स डे 

फादर्स डे हा लोकांसाठी त्यांच्या आयुष्यातील पुरुषांचा उत्सव साजरा करण्याची एक वेळ आहे. मुलांसाठी त्यांच्या वडिलांबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्यापैकी अनेकजण फादर्स डे साजरा करतात, पण या परंपरेमागचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. लक्षणीय बाब म्हणजे सुरुवातीला ही सुट्टी पूर्णपणे स्वीकारली गेली नव्हती. परंतु कालांतराने लोकांनी वडीलांचे त्यांच्या कुटुंबातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन याचा प्रभाव घरातील लहानग्यांवर पडत गेला. 

कसा साजरा करायचा फादर्स डे?

तुम्ही अनेक प्रकारे फादर्स डे साजरा करू शकता. तुम्ही वडीलांसाठी या दिवशी एक खास भेटवस्तू खरेदी करू शकता, त्यांचा आवडता खेळ दाखवण्यासाठी त्यांना घेऊन जाऊ शकता, चित्रपट पाहण्याची योजना करू शकता किंवा ते किती छान आहेत हे सांगणारे कार्ड खरेदी करू शकता. तसेच त्यांच्या आवडीनिवडी पाहून त्यांचे घरात सुशोभिकरण करू शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी