Women's Day History : आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस लैंगिक समानता, महिलांसाठी समान हक्क, हिंसा आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या तातडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. सर्व प्रकारच्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
महिला दिनाची सुरुवात एका आंदोलनापासून झाली होती. खरतरं 1908 साली अमेरिकेत मजदूर आंदोलन झाले होते. या आंदोलनात अनेक महिला आपल्या हक्कासाठी सहभागी झाल्या होत्या. यात नोकरी करणाऱ्या महिलांची आपल्या कामाचे तास कमी करण्याची आणि आपला पगारवाढ करण्याची मागणी होती. यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. मग आंदोलन करणाऱ्या महिलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचला, त्यानंतर एक वर्षानंतर 1909 मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क शहरात साजरा करण्यात आला होता.
अधिक वाचा :अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषत: जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि लैंगिक असमानतेबद्दल जागरुकता वाढवतो. या दिवशी प्रत्येकाने आपल्या समाजातील महिलांचे कर्तृत्व ओळखण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे. मुलींच्या शिक्षणात आणि समाजातील सर्व घटकांमधील लैंगिक भेदभाव दूर करणे आवश्यक आहे.