Vastu Tips: घरात चुकीच्या ठिकाणी लावलेल्या मनी प्लांटमुळे होते मोठे नुकसान, जाणून घ्या योग्य पद्धत

Vastu Tips for money plant : घरातील असंख्य वस्तूंचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यावर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे मनी प्लांटचा. हे घरात लावल्याने धनाचा लाभ होतो, आर्थिक प्रगती होते अशी मान्यता आहे. अनेकदा मनी प्लांट घरात लावूनदेखील लोकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.

Money Plant
मनी प्लांट 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंवर सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ठरते
  • मनी प्लांट ठेवल्याने घरात आर्थिक सुबत्ता येते
  • मनी प्लांट नेमका कसा आणि कोणत्या दिशेस ठेवावा

Money plant Tips: नवी दिल्ली : वास्तुशास्त्राचे मोठे महत्त्व आपल्याकडे आहे. आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, वस्तू , आपण ज्या घरात राहतो ते घर, घरातील असंख्य वस्तूंचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यावर वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे मनी प्लांटचा (Money Plant). हे घरात लावल्याने धनाचा लाभ होतो, आर्थिक प्रगती होते अशी मान्यता आहे. मात्र याचा काहीवेळा विपरित परिणामदेखील होतो. अनेकदा मनी प्लांट घरात लावूनदेखील लोकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे केल्यानंतरच त्याचे योग्य आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात. घरात मनी प्लांट कोणत्या दिशेने आणि कसे ठेवायचे याबद्दल जाणून घ्या. (Where and how to keep money plant in the home as per Vastushastra read in Marathi)

अधिक वाचा  : Winter Health Tips: हिवाळ्यात टाचांना तडे का जातात? ही असतात महत्त्वाची कारणे...अशी घ्या काळजी

मनी प्लांट संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

वास्तुशास्त्रात काही झाडे सांगितली आहेत, ज्यांना योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास ते चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करतात.वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. मनी प्लांट योग्य दिशेला आणि योग्य स्थितीत ठेवल्यानेच शुभफळ मिळते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात आग्नेय दिशेला ठेवणे फायद्याचे असते. कारण ही दिशा गणेशाची असल्याचे मानले जाते. असे केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत सरकारात्मक वातावरण निर्माण होते. मात्र मनी प्लांट जर घरात योग्य पद्धतीने ठेवले नाही तर त्याचे उलटेदेखील परिणाम होतात. 

अधिक वाचा  : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद

कोणत्या दिशेला ठेवावे

वास्तूशास्त्रातील मान्यतेनुसार मनी प्लांटची दिशा खूप महत्त्वाची असते. आग्नेय दिशा खूप शुभ मानली जाते कारण श्रीगणेश हे या दिशेचे दैवत आहेत. म्हणूनच या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते. इथे लक्षात घेतले पाहिजे की मनी प्लांट चुकूनही ईशान्य दिशेला लावू नये. असे केल्याने त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

मनी प्लांटला जमिनीला लागता कामा नये 

मनी प्लांटचे वेल मोठे झाल्यावर ते जमिनीवर पसरतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर ही वेल जमिनीवर पडली असेल तर ती तुमच्या आर्थिक यशात अडथळा आणू शकते. म्हणूनच मनी प्लांटची वेल धागा किंवा काठीच्या साहाय्याने लटकवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून ते जमिनीवर येणार नाहीत.

अधिक वाचा  : Bank Locker New Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! रिझर्व्ह बॅंकेने बँक लॉकरच्या नियमांमध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या विस्ताराने

वाळलेली पाने काढून टाका

मनी प्लांटची काही पाने कोरडी होतात. मात्र वास्तूनुसार मनी प्लांटची कोरडी पाने आणि वेल अशुभाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे अशी पाने ताबडतोब काढून टाका. जर संपूर्ण झाडच सुकले असेल तर ते काढून टाका आणि नवीन मनी प्लांट लावा.

बाहेर लावू नका

वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी घरातच लावले पाहिजे. ते घराबाहेर लावल्याने त्याचे शुभफळ तुम्हाला मिळत नाही अशी मान्यता आहे. मनी प्लांटचे वेल घराबाहेर लटकता कामा नये.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्या आधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी