Air conditioner: 3 स्टार आणि 5 स्टार AC यामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कोणता एसी तुमच्यासाठी बेस्ट

difference between 3 and 5 star Air conditioner: उन्हाळ्यात एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, एसी नेमका कोणता घ्यावा? थ्री स्टार की फाईव्ह स्टार ? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या...

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 3 स्टार आणि 5 स्टार AC यामध्ये काय आहे फरक?
  • नेमका कोणता एसी खरेदी करावा?

Which Air Conditioner to buy: उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानात गारवा मिळावा यासाठी एअर कंडिशन म्हणजेच एसीची मागणीही वाढू लागली आहे. मात्र, नेमका कोणता एसी आपण खरेदी करावा हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. थ्री स्टार एसी खरेदी करावा की फाईव्ह स्टार एसी खरेदी करावा? या दोघांमध्ये किती अंतर आहे? असे विविध प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतात. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला याच्या संदर्भात माहिती  देणार आहोत.

हे पण वाचा : लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय

तज्ज्ञांच्या मते, एनर्जी एफिशिएन्सी म्हणजेच वीजेच्या वापरानुसार एअर कंडिशनरला वेगवेगळे रेटिंग्स दिलेले असतात. फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या एसीला कमी वीजेची आवश्यकता लागते आणि त्याच्या वापरावर येणारे वीज बिल सुद्धा कमी येते. तर थ्री स्टार रेटिंग असलेल्या एसीसाठी जास्त वीजेची आवश्यकता असते आणि त्याच्या वापरावर येणारे वीज बिल सुद्धा जास्त येते. पण किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फाईव्ह स्टार एसी हे थ्री स्टार एसीच्या तुलनेत जास्त महाग असतात.

हे पण वाचा : गरोदरपणात कारले खावे की नाही?

5 स्टार एसीला कमी वीज का लागते?

5 स्टार एसीमध्ये मोठं कंडेंसन असते. त्यामुळे ते कमी वीज घेते. तर थ्री स्टार रेटिंग्स असलेल्या एसीमध्ये लहान कंडेंसन असतात आणि त्याच्या वापरासाठी जास्त वीजेची आवश्यकता असते. त्यामुळे फाईव्ह स्टार एसीच्या तुलनेत थ्री स्टार एसीला येणारं वीज बिल हे अधिक असते.

हे पण वाचा : रात्रभर जागल्याने होऊ शकतात हे आजार

एक 3 स्टार एसीच्या वापरासाठी 1.1 युनिट प्रति तास इतकी वीज लागते. तर 1.5 टनचा 5 स्टार एसी 0.84 युनिट प्रति तास इतकी वीज घेतो. सध्याच्या काळात बाजारात विक्री होणारे थ्री स्टार एसी फिल्टरसह येतात. कारण, हवेमुळे येणारी धुळ आणि प्रदुषण हे फिल्टर करुन बाहेर फेकता येईल. तसेच यामध्ये टर्बो मोड, स्लीप मोड आणि ईको मोड असे फीचर्स असतात.

हे पण वाचा : काय बोलता! हेअर जेल वापरल्याने केस गळतात?

सध्याच्या काळात बाजारात स्मार्ट एसी सुद्धा उपलब्ध होऊ लागले आहेत. यांचं कार्य ट्रेडिशन एसी प्रमाणेच असते मात्र, त्यात वायफाय कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोनवरुन ऑपरेट करता येण्याची सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या एसीचा रिमोट हरवला तरी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनमधून तो एसी चालू-बंद करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी