Vastu Tips : आयुष्यात वेळेला (Time) प्रचंड महत्त्व असतं. योग्य वेळ हीच आयुष्याला योग्य मार्ग देण्यासाठी कारणीभूत ठरत असते. आपल्याला सतत वेळ दाखवणारं घड्याळ (Clock) हे वास्तूशास्त्रात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कामाच्या धावपळीत लोक कुठल्याही दिशेला आपल्या सोयीप्रमाणे घड्याळ लावून टाकतात आणि वर्षानुवर्षे त्याच जागी घड्याळ राहतं. मात्र ही जागा (Right Direction) योग्य नसेल, तर त्याचे बरेच दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. घड्याळ कुठल्या बाजूला लावावं, याचे वास्तूशास्त्रात काही आडाखे मांडण्यात आले आहेत. त्याप्रमाणे जर घऱातील घड्याळाची रचना केली, तर अधिक वेगाने आपली प्रगती होते, असं मानलं जातं. विशेषतः कामाच्या जागी जर योग्य ठिकाणी घड्याळ नसेल, तर प्रगतीचा वेगही मंदावत असल्याचा अनुभव काहीजण व्यक्त करतात. जाणून घेऊया, घरात घड्याळ लावण्याची योग्य जागा कुठली आणि कुठल्या जागी घड्याळ लावणं टाळायला हवं.
वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तू कुठल्या दिशेला असावी, याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार घड्याळ्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचं काम काय आहे, त्यापासून कुठल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते यासारख्या अनेक बाबींचा विचार करून योग्य दिशा ठरवण्यात आल्या आहेत. बहुतांश वास्तुशास्त्रज्ञ देत असलेल्या माहितीनुसार घड्याळ हे पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावं, असा सल्ला देण्यात येतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते, असं सांगितलं जातं. या दिशांना घड्याळ लावल्यामुळे आपला काळ चांगला जातो आणि कमीत कमी संकटं आपल्यावर येतात, असं वास्तूशास्त्रात सांगितलं जातं.
प्रत्येक गोष्ट कुठल्या बाजूला असावी आणि कुठली दिशा टाळावी, याबाबत वास्तूशास्त्रात मार्गदर्शन करण्यात येतं. गेल्या काही वर्षांत वास्तूशास्त्राचं ज्ञान असणाऱ्यांना मोठी मागणी असून या बाबींचा विचार करून घराची रचना करणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. वास्तूशास्त्रानुसार घराची रचना केली, तर अधिक फायदा होतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे आपल्याकडून कुठलीही गोष्ट चुकीची होऊ नये, या भावनेनं अनेक लोक वास्तूशास्त्रज्ञांना पाचारण करतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार घराची रचना करतात. अनेक बिल्डरही इमारतीचा आराखडा तयार करताना वास्तूशास्त्र तज्ज्ञांची मदत घेतात आणि आपला प्रोजेक्ट वास्तूशास्त्राचा विचार करून तयार करण्यात आल्याची जाहीरात करतात.
अधिक वाचा - Parenting Tips : पालक म्हणून या सवयी करतात मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त, वेळीच बदला या 10 गोष्टी
डिस्क्लेमर - वास्तूशास्त्रातील या काही सामान्यतः दिल्या जाणाऱ्या टिप्स आहेत. याच्या सत्यतेची खात्री देता येत नाही. याबाबत काही प्रश्न असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे आवश्यक आहे.