Escalators: शूज स्वच्छ करण्यासाठी नाही तर, 'या'साठी असतात एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश; जाणून घ्या त्यामागचं कारण

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 20, 2022 | 15:25 IST

Use Of Escalators:स्केलेटरच्या बाजूला लावण्यात आलेले ब्रश तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील.पण कधी तुम्ही विचार केला आहे का की ते ब्रश तिथे का बसवण्यात आले आहेत.

Escalators
एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? 
थोडं पण कामाचं
  • एस्केलेटरच्या (escalators) बाजूला बसवण्यात आलेले ब्रश (brush).
  • एस्केलेटरच्या बाजूला लावण्यात आलेले ब्रश तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील.
  • ते ब्रश फक्त डिझाइनसाठी किंवा त्या ब्रशचा वापर शूज स्वच्छ करण्यासाठी करता येतो.

नवी दिल्ली: Escalators Side Brushes Use: आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही कधीच विचार केला नसेल. अशी एक गोष्ट आहे की, तुम्ही ती गोष्ट दररोज पाहता. त्याचा तुम्हाला खूप उपयोग ही होतो. मात्र एकतर आपण त्याकडे लक्ष देत नाही किंवा आपल्याला त्यांच्या वापराबद्दल माहिती नसते. आज तिच गोष्टीबद्दल आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत. ती गोष्ट म्हणजे एस्केलेटरच्या (escalators)  बाजूला बसवण्यात आलेले ब्रश (brush). एस्केलेटरच्या बाजूला लावण्यात आलेले ब्रश तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील.पण कधी तुम्ही विचार केला आहे का की ते ब्रश तिथे का बसवण्यात आले आहेत. 

ते ब्रश फक्त डिझाइनसाठी किंवा त्या ब्रशचा वापर शूज स्वच्छ करण्यासाठी करता येतो असा जर का तुम्ही विचार करत असाल तर तुम्हीचा अंदाज चुकीचा आहे. एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश शूज स्वच्छ करण्यासाठी नसतात. मॉल किंवा मेट्रोच्या एस्केलेटरवर ब्रशने बूट खेळताना किंवा साफ करताना आपण अनेकदा पाहिले आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे ब्रश तुमच्या सुरक्षेसाठी असतात. 

अधिक वाचा- मुसळधार पावसात अडकले संपूर्ण गाव, ढगफुटी सदृश्य पावसाचा Live Video

एस्केलेटरच्या बाजूला का असतात ब्रश? 

Escalators वरील हे ब्रश साइड आणि वॉलमधील अंतर लपवण्याचे काम करतात. शू लेस किंवा स्कार्फ सारख्या छोट्या गोष्टी या अंतराच्या आत येऊ नयेत म्हणून हे ब्रश लावण्यात आलेले असतात. एस्केलेटरवर या सर्व गोष्टी अडकल्या तर मशीन खराब होऊन बंद पडू शकते. म्हणूनच तिथे ब्रश इंस्टॉस करण्यात येतात. अशा परिस्थितीत हातातून किंवा खिशातून एखादी छोटीशी गोष्ट जरी पडली, तरीसुद्धा ती या अंतरांमध्ये न जाता ब्रशमधून वळवून पायऱ्यांवरच थांबते.

याशिवाय एस्केलेटरच्या किनाऱ्यावर कोणी आले तर पाय अडकू शकतो. ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. मात्र अशा परिस्थितीत हे ब्रश तुम्हाला अपघातांपासून वाचवण्याचे कामही करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी