Porn in office : ऑफिसमध्ये काम करताना लोक काय काय पाहतात? रिपोर्ट वाचून बसेल धक्का

ऑफिसमध्ये पॉर्न पाहणं, ही कल्पना अद्यापही आपल्याकडे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. मात्र प्रत्यक्षात बहुतांशस कर्मचारी ऑन ड्युटी पॉर्न पाहत असल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

Porn in office
ऑफिसमध्ये काम करताना लोक काय काय पाहतात?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑफिसमध्ये अनेकजण पाहतात पॉर्न
  • बहुतांश जण ब्रेकमध्ये पाहतात अडल्ट कंटेंट
  • नव्या सर्वेक्षणातून महत्त्वाचे मुद्दे आले समोर

Porn in office : ऑफिसमध्ये काम (Office work) करताना ब्रेक (Break) घेण्याची अनेकांना सवय असते. सलग काही तास काम केल्यानंतर मध्ये ब्रेक घेणं ही प्रत्येकाची गरजही असते. मात्र या ब्रेकचा उपयोग कशासाठी (Utilization) करायचा, हे ठरवणं हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असतो. काहीजण या वेळेत एक वॉक (Walk) घेतात आणि आपला कंटाळा घालवण्याचा प्रयत्न करतात. काहीजण शॉपिंग वेबसाईट (Shopping websites) पाहतात आणि काही वस्तू खरेदी करतात, तर काहीजण मात्र हा वेळ पॉर्न (Porn) पाहण्यात खर्च करतात. गेल्या काही वर्षांत ऑफिसमध्ये बसून पॉर्न पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं एका सर्व्हेमधून दिसून आलं आहे. 

त्यात काय एवढं?

कार्यालयीन वेळेत पॉर्न पाहण्याला काही कार्यालयांमध्ये बंदी असते. मात्र कामाच्या वेळेत पॉर्न पाहण्यात काहीच विशेष किंवा गैर नसल्याचं अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात. अर्थात अद्याप आपल्याकडे ऑफिसमध्ये पॉर्न पाहणे ही ‘चोरून’ कऱण्याची क्रियाच असते. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून बहुतांश लोक कार्यालयीन वेळेत मिळणाऱ्या ब्रेकमध्ये पॉर्न पाहणं पसंत करत असल्याचं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Relationship Tips: जाणून घ्या कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना जास्त करतात आकर्षित, तुमच्यात आहेत का हे गुण?

काय आहेत निरीक्षणं?

कास्पर्सकी या सिक्युरीटी फर्मनं 2020 साली एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार वर्क फ्रॉम होम कऱणारे बहुतांश कर्मचारी हे कामादरम्यान त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर अडल्ट कंटेट पाहणं पसंत करत असल्याचं दिसून आलं. 2021 साली जगातील सर्वात मोठी पॉर्न बेवसाईट असणाऱ्या पॉर्नहबकडून एक सर्व्हे करण्यात आला. काम सुरू असतानाही लोक तासन्‌तास पॉर्न पाहत असल्याचं निरीक्षण त्यात नोंदवण्यात आलं. रात्री 10 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सर्वाधिक पॉर्न पाहिलं जात असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. दुपारी 4 नंतर म्हणजे कार्यालयीन वेळ संपत आली असताना अनेकजण पॉर्न पाहायला सुरुवात करतात, असंही त्यातून दिसून आलं आहे. 

ब्रिटनमध्ये एक खासदार महोदय सभागृहात पॉर्न पाहत असल्याचं प्रकऱण नुकतंच समोर आलं होतं. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेत बसून काही आमदार पॉर्न पाहत असल्याचंही स्पष्ट झालं होतं. कामावर असताना लोक पॉर्न का पाहतात, त्यांना ते पाहावंसं का वाटतं, असा प्रश्न विचारला जातो.

अधिक वाचा - Swapna Shastra: तुमच्या स्वप्नात कावळे दिसले का? पाहा काय असतो याचा अर्थ शुभ की अशुभ

ऑन ड्युटी का पाहतात पॉर्न?

ऑन ड्युटी पॉर्न पाहण्यामागे काही मानसशास्त्रीय कारणं असल्याचं सांगितलं जातं. कामाचा प्रचंड कंटाळा येणं आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी पॉर्न हा उत्तम पर्याय असल्यामुळे लोक त्याकडे वळत असल्याचं सांगितलं जातं. काहीजण नवा अनुभव घेण्यासाठीही पॉर्न पाहत असल्याचं दिसतं. लोकांचं प्रत्यक्ष सेक्स लाईफ बोअरिंग असल्यामुळे व्हर्चुअली नवा अनुभव घेण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातो. घरी पॉर्न पाहिल्यावर लोक जसे वागतात, तसे ऑफिसमध्ये वागत नाहीत, हेदेखील या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी