Dog chase bike: तुमच्या बाईकच्या मागे कुत्रे धावतात? मग हे करुन पाहाच...

Tips and Tricks: रात्रीच्या सुमारास तुम्ही बाईकवरुन जात असताना कुत्रे तुमच्यावर भुंकतात किंवा गाडीचा पाठलाग करतात का? असे का होते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • रात्रीच्या सुमारास गाडीच्या मागे धावतात कुत्रे
  • कुत्र्यांपासून संरक्षणासाठी वापरा खास टिप्स

Why Dogs run behind your bikes in night: तुम्ही रात्रीच्या सुमारास बाईकवरुन जात असताना कुत्रे अचानक भुंकण्यास सुरुवात करतात किंवा बाईकच्या मागे धावत असल्याचा अनुभव तुम्हाला येतो का? कुत्रे गाडीच्या मागे जोरात धावतात, इतकेच नाही तर काही वेळा ते हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कुत्रे असे का करतात बरं? यामागे एक वैज्ञानिक कार आहे आणि त्यामुळेच कुत्रे असे करतात. जाणून घ्या काय आहे कारण आणि यापासून बचावासाठी नेमकं काय करावं?

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

कुत्रे असे का करतात?

कुत्रे वास घेऊन ओळखण्याची शक्ती तीव्र असते. ते सहजपणे वास घेऊन कोणतीही लपवलेली वस्तू शोधून काढू शकतात. त्यामुळेच लष्करापासून ते पोलीस दलापर्यंत सर्वचजण तपासकार्यात आपल्या टीममध्ये डॉग स्क्वॉडचा समावेश करतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, कुत्रे वाहनांच्या मागे का धावतात? कुत्र्यांचे एक क्षेत्र असते आणि ते आपले स्वत: ते क्षेत्र ठरवतात. आपल्या परिसरातील गाड्यांची कुत्र्यांना चांगल्या प्रकारे ओळख असते. आपल्या परिसरातील गाडीच्या व्यतिरिक्त इतर गाड्या आल्यास कुत्रे भुंकतात. तसेच गाड्यांच्या वेगामुळेही कुत्रे भुंकतात. गाडी वेगाने तुम्ही चालवली तर कुत्रे त्या गाडीच्या मागे भुंकतात आणि धावू लागतात.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

नेमकं काय करावं?

जर तुम्ही बाईक चालवत असाल आणि कुत्रा तुमच्या दिशेने जोरात धावत येत असेल तर अशा परिस्थितीत गाडीचा वेग कमी करा. गाडीचा वेग कमी केल्याने कुत्रा तुमच्या गाडीच्या मागे धावणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, गाडी थांबवल्यावर कुत्रा चावला तर? तर तसे होणार नाही कारण, गाडी थांबवल्यावर कुत्रा तुमच्या गाडीजवळ येणार नाही.

हे पण वाचा : ट्रेनचं वजन किती असतं रे भाऊ?

गाडी थांबवल्यावर जेव्हा कुत्रा तुमच्या गाडीच्यामागे धावण्याचं थांबेल त्यानंतर गाडी पुन्हा सुरू करा. मात्र, गाडी सुरू केल्यावर वेगाने तेथून निघून जाऊ नका तर गाडी हळूहळू पुढे न्या. असे केल्यास कुत्रा तुम्हाला चावणार नाही आणि तुम्ही सुरक्षितपणे तेथून निघून जाल.

तुम्हालाही कुत्र्यांची भीती वाटत असेल तर या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा. बाईक जोरात चालवू नका कारण असे केल्याने तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही बाईक वेगात चालवली तर कुत्रा तुमच्यावर हल्ला करू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी