Nurses Day 2022: १२ मे रोजी परिचारिका दिन का साजरा केला जातो; जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

लाइफफंडा
Updated May 12, 2022 | 12:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nurses Day History In Marathi | परिचारिका दिन जगभरातील परिचारिकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्याचा दिवस असतो. दरवर्षी १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.

Why is Nursing Day celebrated on 12th May, Learn its history and significance
... म्हणून १२ मे ला परिचारिका दिन साजरा केला जातो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी १२ मे रोजी परिचारिका दिन साजरा केला जातो.
  • हा दिवस साजरा करण्याची प्रेरणा ब्रिटीश नर्स आणि समाजसुधारक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची आहे.
  • पहिला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन १९६५ मध्ये साजरा करण्यात आला होता. 

Nurses Day History In Marathi | मुंबई : परिचारिका दिन (Nurses Day 2022) जगभरातील परिचारिकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्याचा दिवस असतो. दरवर्षी १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी १२ मे रोजी फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. हा विशेष दिवस नर्सेसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेने निवडला होता आणि १९७४ पासून दरवर्षी १२ मे रोजी अधिकृतपणे परिचारिका दिन साजरा केला जातो. (Why is Nursing Day celebrated on 12th May, Learn its history and significance). 

अधिक वाचा : मुंबईसह महाराष्ट्रात उत्तर भारतीय सुरक्षित! : जयंत पाटील

हा दिवस साजरा करण्याची प्रेरणा ब्रिटीश नर्स आणि समाजसुधारक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची आहे. कारण त्यांनी आरोग्य क्षेत्राच्या सुधारणेसाठी आपले जीवन समर्पित केले. दरम्यान यंदाच्या परिचारिका दिनाची थीम "नर्स: ए वॉयस टू लीड- इन्वेस्ट इन नर्सिंग अँड ऑदर राइट्स टू सिक्योर ग्लोबल हेल्थ" अशी आहे. 

अधिक वाचा : पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

... म्हणून १२ मे ला परिचारिका दिन साजरा केला जातो

दरम्यान, १९५३ मध्ये अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागाच्या डोरोथी सदरलँड यांनी ऑक्टोबरमध्ये परिचारिका दिन घोषित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन राष्ट्राध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यानंतर ओहायोमधून काँग्रेससाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला फ्रान्सिस पी. बोल्टन यांनीही "नॅशनल नर्स वीक" साठी बिल प्रायोजित केले होते. परंतु २० वर्षांनंतर फेब्रुवारी १९७४ मध्ये अध्यक्ष निक्सन यांनी दरवर्षी ६ मे ते १२ मे या कालावधीत राष्ट्रीय परिचारिका सप्ताह घोषित केला. यासोबतच १२ मे हा परिचारिका दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. 

लक्षणीय बाब म्हणजे परिचारिका म्हणजेच नर्स डे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीचे प्रतिक आहे, ज्यांना आधुनिक नर्सिंगचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. फ्लोरेन्स नाइटिंगेल एक समाजसुधारक, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि मॉडर्न नर्सिंगच्या संस्थापक आहेत त्यांचा जन्मही १२ मे रोजी झाला होता. तर पहिला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन १९६५ मध्ये साजरा करण्यात आला होता. 

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा परिचारिका दिनाशी कसा संबंध आहे? 

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना जगभरात "लेडी विथ द लॅम्प" म्हणून ओळखले जाते. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी क्रिमियन युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्याच्या जखमी सैनिकांची आणि त्यांच्या सहयोगींची काळजी घेतली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धादरम्यान अनेक वैद्यकीय शिबिरे आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा आणि नर्सिंगची सेवा दिली होती. १८६० मध्ये नाइटिंगेल ट्रेनिंग स्कूलची देखील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये महत्त्वाकांक्षी परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापना करण्यात आली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी