पती पत्नीने चुकूनही करू नये एका ताटात भोजन, भिष्म पितामहंनी सांगितले कारण

why should husband and wife not eat food in same palte : पती पत्नीने चुकूनही एका ताटात भोजन करू नये. जर ही पद्धत आपल्या घरात पाळली जात असेल तर ताबडतोब हा प्रकार थांबवावा. एका ताटात पती पत्नीने का जेवू नये याचे कारण भिष्म पितामह यांनी सांगितले आहे.

why should husband and wife not eat food in same palte
पती पत्नीने चुकूनही करू नये एका ताटात भोजन, भिष्म पितामहंनी सांगितले कारण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पती पत्नीने चुकूनही करू नये एका ताटात भोजन, भिष्म पितामहंनी सांगितले कारण
  • आदर्श स्थितीत घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण करावे
  • भोजनाचा आदर करावा

why should husband and wife not eat food in same palte : पती पत्नीने चुकूनही एका ताटात भोजन करू नये. जर ही पद्धत आपल्या घरात पाळली जात असेल तर ताबडतोब हा प्रकार थांबवावा. एका ताटात पती पत्नीने का जेवू नये याचे कारण भिष्म पितामह यांनी सांगितले आहे. महाभारतात या संदर्भात उल्लेख आहे.

वयाच्या 45 व्या वर्षी, तुम्ही 30 वर्षाच्या युवकाप्रमाणे उर्जा मिळवण्यासाठी या कॅप्सूल वापरू शकता

एकत्र जेवल्याने प्रेम भावना वाढते. संवाद वाढतो. पण यासाठी एकत्र जेवावे, एका ताटात किंवा एका थाळीत पती आणि पत्नी असे दोघांनी जेवू नये. जर पती आणि पत्नी एका ताटात जेवत असतील तर त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना अत्युच्च पातळी पर्यंत वाढण्याची शक्यता असते. या परिस्थितीत ते कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत एकमेकांनाच जास्त महत्त्व देण्याची शक्यता असते. पण घर सुरळीत चालावे यासाठी पती आणि पत्नी यांच्यात प्रेम असणे, संवाद असणे तसेच त्या दोघांनी घरातील इतर सदस्यांचा न्यायाच्या पातळीवर विचार करणे आवश्यक आहे. यासाठी पती आणि पत्नी यांनी एकत्र जेवण करावे पण एका ताटात किंवा एका थाळीत दोघांनी जेवू नये. दोघांचे जेवणाचे ताट किंवा थाळी स्वतंत्र असणे योग्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ही बाब योग्य आहे. 

आदर्श स्थितीत घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण करावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांमध्ये संवाद वाढतो आणि त्यांच्यात एकमेकांविषयी आदराची आणि प्रेमाची भावना निर्माण होते; असे भिष्म पितामह सांगतात. घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांविषयी आदराची आणि प्रेमाची भावना निर्माण झाल्यास त्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते. त्या कुटुंबाची भरभराट होते; असेही भिष्म पितामह सांगतात. 

कोणीही भोजनाचे भरलेले ताट ओलांडून जाऊ नये तसेच भोजनाच्या ताटाला पाय लावू नये. भोजनाचे भरलेले ताट सोडून जाऊ नये तसेच भोजनावर राग काढू नये; असेही भिष्म पितामह सांगतात. भोजनाचा अथवा भोजनाच्या भरलेल्या ताटाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते. त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हे संकट टाळायचे असेल तर भोजनाचा आदर करावा. ताटाला पाय लागला तर त्या ताटाला नमस्कार करावा असे भिष्म पितामह सांगतात.

(Disclaimer :  ही माहिती व्यक्ती, संदर्भ पुस्तिका यांच्या आधारे दिली आहे. पण TimesNowMarathi.com या माहितीची खात्री देत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी