Buttons on pocket: जीन्सच्या पॉकेटवर का असतात छोटी छोटी बटनं? कारण वाचून पडाल विचारात

अनेक वर्ष जीन्स वापरत असूनही त्याच्या खिशावर असणाऱ्या धातूच्या बटनांकडे तुमचं कधी लक्ष गेलंय का? दोन्ही बाजूच्या खिशांवर ही धातूची बटणं लावलेली असतात. ही बटणं जीन्सवर असण्यामागे फार रंजक कारण आहे. त्यामागे एक इतिहासदेखील आहे.

Buttons on pocket
जीन्सच्या पॉकेटवर का असतात छोटी छोटी बटनं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जीन्सच्या खिसांवर असतात छोटी छोटी धातूची बटणं
  • जीन्स स्टायलिश करण्यासोबत त्यामागे आहे एक ऐतिहासिक कारण
  • एकोणिसाव्या शतकात सुरू झाली धातूच्या बटणांची पद्धत

Buttons on pocket: आजकाल जीन्स (Jeans) हा भारतीयांचा रोजचा पेहराव (Daily costume) झाला आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठीही आरामदायक आणि वापरायला सोपा असा हा पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. जीन्स वारंवार धुण्याची गरज पडत नाही, हा त्याचा आणखी एक फायदा. इतर कपड्यांच्या तुलनेत जीन्स घाण होण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे कित्येक आठवडे न धुताही जीन्स वापरता येऊ शकते. अनेक वर्ष जीन्स वापरत असूनही त्याच्या खिशावर असणाऱ्या धातूच्या बटनांकडे तुमचं कधी लक्ष गेलंय का? दोन्ही बाजूच्या खिशांवर ही धातूची बटणं लावलेली असतात. ही बटणं जीन्सवर असण्यामागे फार रंजक कारण आहे. त्यामागे एक इतिहासदेखील आहे. जाणून घेऊया, जीन्सच्या खिशांवरील धातूच्या बटणांची गोष्ट. 

मजुरांसाठी जीन्स

तुम्ही जीन्सच्या खिशावर लावण्यात आलेले धातूचे छोटे छोटे बटन्स बघितले असतील. वास्तविक या बटनांचा काहीच उपयोग होत नाही. मात्र तरीदेखील ही बटन जीन्सवर लावण्यात आलेली असतात. या बटनांमुळे जीन्स अधिक स्टायलिश दिसायला मदत होतेच, मात्र केवळ तेवढेच कारण त्यामागे नाही. जीन्सची निर्मिती ही कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरांसाठी झाली होती. खाणीत काम करत असताना साधं कापड सतत फाटत असे. त्यामुळे जीन्सचं जाडजूड कापड वापरून ट्राउझर शिवण्यात येत होती. इतर कापडांच्या तुलनेने हे कापड जास्त काळ टिकत असे आणि वापरायला ही सोयीचे पडत असे.

अधिक वाचा - जीवनात नव्याने भरतील रंग, या Relationship Tips ने वैवाहिक आयुष्यात होईल दंग

खिशांची गोष्ट

मेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांच्या जीन्सची खिसे फाटणे ही एक मोठी समस्या होती. त्याकाळी मजूर आपल्या खिशात वजनदार सामान ठेवत असत. प्रचंड कष्ट करण्याच्या नादात या सामानाच्या ओझ्यामुळे हे खिसे फाटून जात. वारंवार खिसे फाटक असल्यामुळे मजुरांची चांगलीच पंचाईत होत असे. खिसे फाटल्यामुळे ती जीन्स घालणेही अवघड होत असे.

टेलरला सुचली युक्ती

काम सुरू असताना जेव्हा कामगारांची जीन्स फाटत असे, तेव्हा काम करणे अवघड होत असे. 1973 या वर्षी जेकब डेविस नावाच्या टेलरला एक युक्ती सुचली. जेकब हा त्यावेळी लिव्हाईस कंपनीची जीन्स वापरत होता. या जीन्सच्या खिशांचे कोपरे त्याने धातूच्या बटणांनी शिवले. त्यामुळे थेट जीन्सच्या कापडावर येणारा भार कमी झाला आणि बटणांमुळे खिसे फाटण्याचे प्रमाण कमी झाले. जेकबची ही युक्ती पाहता पाहता लोकप्रिय झाली आणि जीन्स शिवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला.

अधिक वाचा - Honeymoon Tips: हनीमूनला गेल्यावर चुकूनही करू नका 'या' 8 चुका, अन्यथा मजा ठरेल सजा

अनेक सुधारणा

गेल्या दोनशे वर्षात जीन्स शिवण्याच्या तंत्रज्ञानात अनेक सुधारणा झाल्या आहेत. मात्र खिशावर बटन लावण्याची एकोणिसाव्या शतकातील कल्पना आजही राबविली जाते. खिशावर धातूची बटणे असण्याचा हा इतिहास आजही जिवंत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी