Teachers Day 2020: ५ सप्टेंबरला का साजरा केला जातो शिक्षक दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

लाइफफंडा
Updated Sep 05, 2020 | 09:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Teachers Day 2020: आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अखेर ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस का साजरा केला जातो. 

dr. saravapalli radhakrishnan
५ सप्टेंबरला का साजरा केला जातो शिक्षक दिवस? 

थोडं पण कामाचं

  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबरला असतो
  • राधाकृष्णन यांनी आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली होती.
  • शिक्षकाचे एका मुलाच्या आयुष्यात मोठे योगदान असते.

मुंबई: दरवर्षी ५ सप्टेंबरला भारतात शिक्षक दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम असतात तसेच शाळांमध्ये या दिवशी काही मुले शिक्षकांची भूमिका निभावतात.कोणत्याही मुलाच्या आयुष्यातील त्याचे पहिले गुरू त्याचे आई बाबा असतात. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर शिक्षक असतात. शिक्षकाचे एका मुलाच्या आयुष्यात मोठे योगदान असते. शिक्षकाशिवा.विद्यार्थ्यांचे जीवन अपूर्ण मानले जाते. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो. 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबरला असतो. हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. १९६२ पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा कला जातो. राधाकृष्णन यांनी आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हा दिवस साजरा केला जातो. देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८मध्ये तामिळनाडच्या तिरूमनी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची आवड होती. ते स्वामी विवेकानंदाच्या विचाराने प्रभावित होते. राधाकृष्णन यांचे निधन १७ एप्रिल १९७५मध्ये झाले. 

का साजरा केला जातो शिक्षक दिन

जेव्हा डॉ. एस राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्र परिवाराने त्यांच्याकडे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. त्यावेळी त्यांनी सांगितले की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिवस साजरा केला जावा. 

शिक्षक दिनासाठी खास मेसेज

सूर्य किरण जर उगवले नसते, तर आकाशा रंगच समजला नसला
जर महात्मा ज्योतिबा फुले जन्मले नसते तर खरंच स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजले नसते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण शिकवलंत, म्हणूनच आम्ही घडलो. आपणास सादर प्रणाम!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी