Jeans Pant Small Pocket | जीन्स पॅन्टमध्ये छोटे पॉकेट आणि त्याला बटणं का असतात ? पाहा काय आहे कारण...

Jeans Pant Small Pocket | जीन्स पॅन्टला उजव्या बाजूस पुढे असणाऱ्या या छोट्या खिशाची सुरूवात जीन्सच्या जन्मापासून आहे. जीन्स पॅन्टचा जन्म प्रत्यक्षात खाणीत काम करणाऱ्या मजूरांसाठी झाला होता. त्या वेळेस मनगटी घड्याळे नसत. खिशात ठेवता येणारी पॉकेट घड्याळे त्या काळात असायची. त्यामुळे मजूरांनी ही घड्याळे पुढच्या खिशात ठेवली असती तर त्याची तुटफुट होण्याची किंवा घड्याळांचे नुकसान होण्याची भीती होती. या समस्येवर उपाय शोधण्यासाठीच जन्म झाला जीन्समधील या छोट्या खिशाचा.

Jeans Pant Small Pocket
जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो 
थोडं पण कामाचं
  • तरुण-तरुणींमध्ये तर जीन्स पॅन्टची लोकप्रियता प्रचंड
  • जीन्स पॅन्टची खासियत अशी की ती कधीही, कुठेही वापरता येते
  • मागील काही दशकांपासून जीन्स पॅन्ट जगभरातील फॅशनच्या केंद्रस्थानी

Jeans Pant Small Pocket | नवी दिल्ली : जीन्स पॅन्ट (Jeans Pant)ही फॅशनचे अविभाज्य अंग आहे. मागील काही दशकांपासून जीन्स पॅन्ट फॅशनच्या (Centre of Fashion)केंद्रस्थानी आहे. तरुण-तरुणींमध्ये तर जीन्स पॅन्टची लोकप्रियता (Popularity of Jeans pant) प्रचंड आहे. जीन्स पॅन्टची खासियत अशी की ती कधीही, कुठेही वापरता येते. जीन्स पॅन्टबरोबर तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन करू शकता. हल्ली तर अनेक प्रकारच्या रंगात, डिझाइनमध्ये आणि स्टाइलमध्ये जीन्स पॅन्ट बाजारात उपलब्ध आहेत. जगभरातील खूप मोठी लोकसंख्या जीन्सचा वापर करते. अशा या अद्भूत जीन्स पॅन्टला पुढच्या बाजूला एका छोटासा खिसा (Small pocket in jeans pant)असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की हा छोटा खिसा का असतो. हा छोटासा खिसा उजव्या बाजूला असतो. शिवाय या छोट्या खिशाच्या कोपऱ्यावर छोटे बटणदेखील असतात. अनेकांना वाटते की हा खिसा आणि ही बटणे ही फॅशनसाठी असतात. मात्र असे अजिबात नाही, पाहूया जीन्स पॅन्टमध्ये हा छोटा खिसा आणि छोटे बटण का असतात. (Why there is small pocket & Small buttons in Jeans pant, know the reason)

जीन्स पॅन्टला असलेल्या छोटे खिशामागचे कारण

जीन्स पॅन्टला उजव्या बाजूस पुढे असणाऱ्या या छोट्या खिशाची सुरूवात जीन्सच्या जन्मापासून आहे. जीन्स पॅन्टचा जन्म प्रत्यक्षात खाणीत काम करणाऱ्या मजूरांसाठी झाला होता. त्या वेळेस मनगटी घड्याळे नसत. खिशात ठेवता येणारी पॉकेट घड्याळे त्या काळात असायची. त्यामुळे मजूरांनी ही घड्याळे पुढच्या खिशात ठेवली असती तर त्याची तुटफुट होण्याची किंवा घड्याळांचे नुकसान होण्याची भीती होती. या समस्येवर उपाय शोधण्यासाठीच जन्म झाला जीन्समधील या छोट्या खिशाचा. गरजेपोटी सुरू झालेला हा छोटा खिसा नंतर जीन्सचा एक अविभाज्य अंगच बनला. आता तर हा छोटा खिसा एक फॅशनच झाला आहे. जीन्स बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी आहे लेवी स्ट्रॉर्स (Levis). या कंपनीच्या मते हा छोटा खिसा हा वॉच पॉकेट असतो. सुरूवातीच्या काळात जीन्समध्ये चार पॉकेट असायचे. यामध्ये एक पॉकेट मागील बाजूस असायचे आणि दोन पॉकेटमध्ये ही छोटी वॉच पॉकेट असायची.

पॉकेटला मजबूतीसाठी होती बटणे

पॉकेटच्या कडेला लावण्यात आलेली छोटी बटणेदेखील जीन्सच्या जन्मापासूनच आहेत. जीन्सचे कापड हे खूपच रफ अॅंड टफ असते. त्यामुळे ते सहजासहजी फाटत नाही. मात्र याच्या खिशाबद्दल मजूरांची तक्रार असायची. जीन्सचे पॉकेट लवकरच फाटायचे. अशा परिस्थितीत टेलर जेकब डेविसने यावर एक उपाय शोधून काढला. त्याने जीन्सच्या पॉकेटच्या कडेला छोटे-छोटे मेटलचे तुकडे लावण्यास सुरूवात केली.

अशी लागली छोट्या खिशाला बटणे

छोट्या पॉकेटला मेटलचे छोटे तुकडे लावणे यशस्वी ठरले आणि मग हळूहळू त्याची जागा बटणांनी घेतली. या बटणांना रिवेट्स (Rivets)असे म्हणतात. याचबरोबर आणखी मनोरंजक कहाणी आहे. जेकबकडे या युक्तीचे पेटंट करण्यासाठीचे पैसे नव्हते. त्याने लिवाइस स्ट्रॉसला एक पत्र लिहून या शोधाची माहिती दिली. लिवाइसने मेटलच्या तुकड्यांना कॉपरच्या बटणांमध्ये रुपातंरित केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी