White bed sheet reason: हॉटेलमध्ये का वापरतात पांढरं बेडशीट? कारण आहे मजेशीर

पांढऱ्या रंगाचा कुठलंही कापड हे इतर रंगांपेक्षा अधिक खराब होतं. त्यामुळे ते धुण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत असतील, असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र पांढऱ्या रंगाचं बेडसिट धुणं, हे फारच सोपं असतं.

White bed sheet reason
हॉटेलमध्ये का वापरतात पांढरं बेडशीट?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हॉटेलच्या रुममध्ये अंथरण्यात येतं पांढरं बेडशीट
  • ब्लीच आणि क्लोरीनचा वापर करून बेडशीट धुणं सोपं
  • नव्वदच्या दशकात सुरु झाली पद्धत

White bedsheet reasons: तुम्ही कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये (Hotel) उतरला असाल. तेव्हा तिथल्या खोल्यांमध्ये पांढऱ्या रंगाचं बेडसिट (White bed sheet) अंथरल्याचं तुम्ही पाहिलं असेल. साधारणतः प्रत्येक हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या बेडसिटचाच वापर करण्यात आलेला असतो. इतर कुठल्याही रंगाचा वापर न करता फक्त पांढऱ्या रंगाचं बेडसिटच का वापरलं जात असेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागे काही साधीसोपी आणि व्यावहारिक कारणं आहेत. 

चादर धुणं पडतं सोपं

पांढऱ्या रंगाचा कुठलंही कापड हे इतर रंगांपेक्षा अधिक खराब होतं. त्यामुळे ते धुण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत असतील, असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र पांढऱ्या रंगाचं बेडसिट धुणं, हे फारच सोपं असतं. हॉटेलमधील बेडसीट हे ब्लीच आणि क्लोरीन यांचा वापर करून धुण्यात येतं. त्यामुळे बेडसीट पटकन स्वच्छ होतं आणि त्यावर असणारे डाग सहजरित्या निघून जातात. जर रंगीत बेडसीट असेल तर ते ब्लीच करून धुता येत नाही. ब्लीच केल्यामुळे इतर कुठलाही रंग हा फिकट व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे ब्लीच आणि क्लोरीनचा वापर केल्यामुळे चादरी आणि बेडशीट यांना कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. 

अधिक वाचा - Optical Illusion: शोधून-शोधून मुलगा थकला तरीही सापडला नाही बूट, पाहा तुम्हाला दिसतोय का?

हॉटेलची खोली वाटते प्रशस्त

पांढरा रंग हा नेहमी अलिशान जीवनशैलीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे हॉटेलच्या खोलीत पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे रुमला लग्झरी लूक यायला मदत होते. पांढऱ्या रंगाचा बेडसिटचा वापर केल्यामुळे खोलीचा आकारदेखील मोठा दिसतो. त्यामुळे बेडवर पांढऱ्या रंगाची चादर किंवा बेडशीट अंथरलं जातं. त्याशिवाय पांढऱ्या रंगाचं बेडशीट विकत घ्यायला सर्वात कमी खर्च येतो. 

अधिक वाचा - Must things in bag: प्रत्येकाने आपल्या बॅगेत ‘या’ वस्तू नेहमी ठेवाव्यात, आयुष्य होईल सोपं

नव्वदच्या दशकात सुरु झाली पद्धत

हॉटेलच्या रुममध्ये पांढरी चादर अंथरण्याची प्रथा ही नव्वदच्या दशकात सुरू झाली. त्यापूर्वी अशी पद्धत नव्हती. 1990 पूर्वी हॉटेलमधील अस्वच्छता झाकण्यासाठी रंगीबेरंगी चादरींचा आणि बेडशीटचा उपयोग करण्यात येत होता. त्याच काळात रुमला लक्झरी लूक देण्याची पद्धत महानगरांमध्ये सुरू झाली. त्यावेळी आपलं हॉटेल स्वच्छ आणि टापटिप आहे, हे सिद्ध करण्यासाठी पांढऱ्या रंगाचं बेडशीट वापऱण्यास काही हॉटेल्सनी सुरुवात केली. हळूहळू हा ट्रेंड सर्वत्र पसरत गेला आणि सगळ्याच हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर आणि बेडशीट वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जेव्हा ब्लिच आणि क्लोरीनच्या मदतीने चादर आणि बेडशीट साफ कऱणं अधिक सोयीस्कर असल्याचं दिसून आलं, तेव्हा तर हा प्रयोग देशभर वेगाने पसरला आणि प्रत्येक छोट्यामोठ्या हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीटने स्थान पटकावलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी