Relationship Tips: पत्नी नवऱ्यावर का संशय घेते, ही असतात 4 मोठी कारणे...

Relationship Tensions : पती-पत्नीचे नाते (Husband-Wife relationship)हे अतिशय गुंतागुतीचे आणि तणावांनी भरलेले असते. वैवाहिक जीवन दीर्घकाळ आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर नाते टिकणे कठीण होते. अनेकदा आपण पाहिले आहे की एखाद्या छोट्या गोष्टीमुळेही मोठी फाटाफूट होऊ शकते, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. भारतीय समाजात बहुसंख्य पुरुष नोकरी करणारे आहेत. तर अनेक महिला गृहिणीची भूमिका बजावतात.

Husband-Wife relationship
पती-पत्नीमधील ताणतणाव 
थोडं पण कामाचं
  • नाते आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास असणे अत्यंत आवश्यक
  • एखाद्या छोट्या गोष्टीमुळेही मोठी फाटाफूट होऊ शकते, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते
  • स्मार्टफोनमुळे एकमेकांमधील संवाद कमी होत चालला आहे

Why Wife Doubt Her Husband:नवी दिल्ली : पती-पत्नीचे नाते (Husband-Wife relationship)हे अतिशय गुंतागुतीचे आणि तणावांनी भरलेले असते. वैवाहिक जीवन दीर्घकाळ आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर नाते टिकणे कठीण होते. अनेकदा आपण पाहिले आहे की एखाद्या छोट्या गोष्टीमुळेही मोठी फाटाफूट होऊ शकते, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. त्यातच स्मार्टफोनमुळे एकमेकांमधील संवाद कमी होत चालला आहे. पतीने आपल्याकडे दुर्लक्ष करणे अनेक पत्नींना खूप त्रासदायक ठरते. दिवसातील मोठा वेळ एकमेकांसाठी उपलब्ध नसणे आणि इतर अनेक चुकांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. अनेकवेळा गैरसमजातून किंवा परिस्थितीमुळे पत्नी पतीवर संशय करू लागते. अशी कारणे जाणून घेऊया ज्यामुळे पत्नीला पतीवर संशय का येतो? (Why wife doubts their husbands, check these 4 reasons)

अधिक वाचा : प्रेमात अनेकदा या लोकांचा होतो भ्रमनिराश, नावाचे पहिले अक्षर तपासा... यात तुम्ही तर नाही ना!

भारतीय समाजात बहुसंख्य पुरुष नोकरी करणारे आहेत. तर अनेक महिला गृहिणीची भूमिका बजावतात. अर्थात अलीकडच्या काळात अनेक महिलादेखील करियर घडवत आहेत. यामुळे अनेकदा पती आणि पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळणे, एकमेकांच्या भावना लक्षात घेणे यासारख्या बाबींवर सध्याच्या तणावयुक्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीचादेखील परिणाम होतो आहे.

पत्नीला पतीवर संशय का येतो?

1. आपसातील संवादाचा अभाव
तुमच्या लग्नाला काही महिने किंवा अनेक वर्षे उलटून गेली आहेत, पती-पत्नीमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर आपापसातच हे प्रकरण सोडवणे योग्य ठरते. व्यस्त जीवनामुळे पुरुष जर पत्नीशी कमी बोलत असतील तर नाते बिघडते.

अधिक वाचा : घराच्या भिंतीशी संबंधित 'या' 4 चुकांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होईल बराच फायदा

2. मुलींशी मैत्री मान्य नाही
मैत्री हे एक असे नाते आहे जे लग्नानंतरही टिकते. सहसा जेव्हा एखादा पुरुष त्याच्या मैत्रिणीशी बोलतो तेव्हा अनेकदा त्याच्या बायकोला हेवा वाटू लागतो, ज्यामुळे भांडणे वाढतात. यासाठी पतीने आपल्या पत्नीला खात्री देणे आवश्यक आहे की तिचे स्थान त्याच्यासाठी कोणत्याही मैत्रिणीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

3. मोबाईलला चिकटणे
पतीने घरी आल्यावर तिच्याशी बोलावे आणि तिला दर्जेदार वेळ द्यावा, असे प्रत्येक पत्नीला वाटते. परंतु अनेक पुरुष मोबाइलवरील अटॅचमेंट सोडू शकत नाहीत, ते स्मार्टफोनलाच चिटकून बसतात. जर पुरुष मोबाईल पाहून जास्त हसत असतील तर बायकोचा संशय अनेक पटींनी वाढतो. म्हणूनच फोनवर जाण्यापेक्षा आयुष्याच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवणे चांगले.

अधिक वाचा : Relationship Tips: पार्टनरला सरप्राईज देताना करू नका या चुका

4. माजी प्रेयसीला पतीने न विसरणे
लग्नाआधी तुमचे अनेक नातेसंबंध जुळले असतील, पण कोणत्याही पुरुषासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती ही त्याची पत्नी असावी. हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही पत्नीसोबत गप्पा मारता तेव्हा तुमच्या माजी मैत्रिणीबद्दल बोलू नका, नाहीतर तुमच्या पत्नीला असे वाटेल की तुम्ही तिला अजूनही मिस करत आहात आणि तिला विसरणे कठीण आहे. महिलांच्या मनात शंका निर्माण करण्याचे हे एक मोठे कारण आहे.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी