Face Packs: ग्रीन टीपासून बनवा घरच्या घरी 'हे' तीन फेस पॅक

लाइफफंडा
Updated Jan 10, 2020 | 16:20 IST

Face pack for all skin type: हिवाळ्यात स्किनला जास्त काळजी घेण्याची गरज असते. अशात तुम्ही वेट लॉससाठी पित असणारी ग्रीन टीचा प्रयोग फेस पॅक बनवण्यासाठी करू शकता. 

Green Tea Face Packs
Face Packs: ग्रीन टीपासून बनवा घरच्या घरी 'हे' तीन फेस पॅक 

ग्रीन टी केवळ वेट लॉससाठी मदत करत नाही तर ती फेस पॅक आणि स्क्रब बनवण्यासाठीही त्याचा वापर केला जावू शकतो. जर तुम्ही घर बसून काही नवीन आणि  नॅचरल ट्राय करू इच्छित असाल तर ग्रीन टी पेक्षा आणखीन काही चांगलं असू शकत नाही. तुमची स्किन ड्राय असो किंवा ऑईली, ग्रीन टी पूर्णपणे व्यवस्थित करते. 

यात अॅटिऑक्सिडेंटसोबत एंजाइम, फोलेट, व्हिटामिन बी, पोटॅशिअम, कॅफिन इत्यादी जास्त प्रमाणात असतात. जगभरात ग्रीन टीचा उपयोग ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये केला जातो. जर तुम्ही सुद्धा ग्रीन टीचा फेस मास्क वापरू इच्छित असाल तर खालील बातमी वाचा. 

ग्रीन टी फेस पॅक बनवण्याच्या सोप्या पद्धती

ग्रीन टी आणि मिल्क पावडरः

एका बाऊल घ्या, त्यात बेसन, हळद आणि दूध पावडर टाका. ओट्स मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि वरील मिश्रणात मिसळा. टी बॅगमधील चहा काढून वरील मिश्रणात मिसळा. आता यात गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. तुमच्या ग्रीन टीचा मास्क तयार आहे. स्वच्छ चेहऱ्यावर हे लावून 20 मिनिटांपर्यंत ठेवून द्या. त्यानंतर चेहरा गरम किंवा साध्या पाण्यानं धुवून टाका. यानं तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकण्यास सुरूवात होईल. 

ग्रीन टी- लिंबू आणि बेसन पॅकः

ग्रीन टीची पानं उकळून घ्या. उकळलेलं पाणी गाळून वेगळ्या कंटेनरमध्ये वेगळं ठेवून द्या. हे पाणी पूर्णपणे थंड होऊ दे. या चहामध्ये एक चमचा बेसन आणि लिंबाचा रस मिसळा. आता हा मास्क आपल्या चेहऱ्यावर लावा, थोडावेळ ते सुकू द्या आणि मग चेहरा धुवा. हा मास्क सुकण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण याचा प्रभाव बघण्यासारखा असेल. 

ग्रीन टी फेस स्क्रब मास्कः 

ग्रीन टीची बॅग एका गरम पाण्याच्या वाटीत बुडवा आणि थोड्यावेळानं ती खोलून त्याच्यातली सर्व पानं काढून टाका. मग त्यात एक चमचा शुद्ध मध टाका. त्यानंतर त्यात लिंबाच्या रसाचे 5-6 थेंब मिसळवा. त्यात 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ मिसळून तो चांगलं एकजीव करा. यामुळे मुरुमांच्या निशाण्याबरोबरच ऑईली स्किनवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

हिवाळ्यात त्वचेच्या बर्‍याच समस्या उद्धभवतात. ज्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी आहे. रात्री झोपेच्या आधी ग्रीन टीनं बनवलेले फेसपॅक लावणे चांगलं असतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...