Mushroom Soup: हिवाळ्यात बनवा गरमागरम मस्त चविष्ट क्रिमी गार्लिक मशरूम सूप 

Soup recipe: हिवाळ्यात जर का तुम्ही एक हेल्दी सूपची रेसिपी शोधत असाल तर क्रिमी गार्लिक मशरूम सूप बनवू शकता. हे सूप सर्वांना नक्कीच आवडेल. जाणून घेऊया या सूपची रेसिपी. 

Mushroom Soup
हिवाळ्यात बनवा गरमागरम मस्त चविष्ट क्रिमी गार्लिक मशरूम सूप   |  फोटो सौजन्य: Instagram

हिवाळ्याच्या दिवसात सूप पिण्याचा वेगळाच आनंद असतो. या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीचे सूप उपलब्ध होतात. ज्यात गार्लिक मशरूम सूपचा आनंदही वेगळाच असतो. हे सूप घर आरामात आणि सहज तुम्ही बनवू शकता. मशरूम तसंचही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. जर का तुम्ही आपल्या कुटुंबियांना हेल्दी ठेवू इच्छित असाल तर हे सूप नक्की ट्राय करा. 

क्रिम गार्लिक मशरूम सूपसाठी लागणारे साहित्य 

 • 2 ते 3 लसूण
 • 2 चमचे बटर 
 • 2 ते 3 काळी मिरी
 • 1/2 मैदा
 • 500 ग्रॅम मशरूम
 • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल 
 • 2 कप व्हेजिटेबल स्टॉक 
 • 1/2 कप फुल फॅट मिल्क क्रिम
 • 1/2 थाइम 
 • 2 कप पाणी 
 • 1 कप सोया सॉस
 • मीठ स्वादानुसार

क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची कृती 

 1. मशरूम चांगले धुवून घ्या आणि दोन भागात कापा. 
 2. पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. त्यानंतर त्यात मशरूम, लसूण, मीठ आणि काळी मिरी टाका.
 3. आता मशरूममधील पाणी जोपर्यंत सुखत नाही तोपर्यंत हे सर्व शिजवा.
 4. दुसरीकडे आणखी वेगळा एक पॅन घ्या त्यात बटर आणि मैदा एकत्र करा. हे मिश्रण सतत हलवत राहा. 
 5. मग त्यात मशरूम टाका आणि काहीवेळा नंतर व्हेजिटेबल स्टॉक टाका.
 6. याच दरम्यान त्यात थाइम मिसळा.
 7. आता हे मिश्रण तोपर्यंत हलवत राहा जोपर्यंत यातील मैदा दिसे नासा होईल आणि व्हेजिटेबल स्टॉक घट्ट होत नाही. 
 8. गॅसची कमी ठेवा. मग पॅनमध्ये क्रिम मिसळा. सूप घट्ट होण्यास सुरूवात होईल.
 9. शेवटी सोया सॉस टाका आणि सूप गरम गरम सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी