Tips for dry skin: हिवाळ्यात स्किन कोरडी होते, मग जाणून घ्या 'या' 7 टीप्स 

How to treat dry winter skin: हिवाळ्यात आपली स्किन खूप ड्राय होते. यासाठी स्किनची एक्स्ट्रा केअर करण्याची गरज आहे. येथे जाणून घ्या काही खास स्किन केअर टीप्स 

How to treat dry winter skin
Tips for dry skin: हिवाळ्यात स्किन कोरडी होते, मग जाणून घ्या 'या' 7 टीप्स  

हिवाळ्यात स्किनची परिस्थिती एकदम खराब होते. यावेळी स्किन ड्राय होते आणि फाटण्यास सुरूवात होते. ज्या महिलांची स्किन आधीच ड्राय असते त्यांना थंडीत आणखीन जास्त त्रास होतो. काही लोकं आपली स्किन मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी हिवाळ्यात घरगुती गोष्टींचा वापर करतात. हिवाळ्यात आपल्या स्किनची जरूर काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्या स्किननुसार प्रोडक्ट्सची सुद्धा निवड केली पाहिजे. महिला हिवाळ्यात बऱ्याच प्रकारचे मॉश्चराइजर्स आणि लोशनचा उपयोग करतात. मात्र या सीझनमध्ये घरगुती गोष्टींचा वापर केला तर आणखी जास्त फायदा होतो. थंडीत स्किनला एक्स्ट्रा केअरची गरज असते. यासाठी जाणून घेऊया काही खास स्किन केअर टीप्स

मॉश्चराइजर्स लावण्याची सवय लावा 

हिवाळ्यात आपल्या कोमल त्वचेला ड्राय करू नका. त्यावर शिया बटर किंवा बी वॅक्स युक्त मॉश्चराइजर्स लावा. रात्री झोपण्याच्याआधी स्किनला मॉश्चराइजर्स जरूर लावा. 

वॅसलीन तुमचा चांगला मित्र 

कोरडे पाय, कोपर आणि गुडघ्यांसाठी जर का कोणती एक क्रिम हवी असेल तर वॅसलीनशिवाय आणखी चांगलं काहीच नाही. लिप बामपासून फूट क्रिम आणि मेकअप रिमूव्हरपर्यंत, ही क्रिम प्रत्येक गोष्टीसोबत परफेक्ट बसते. 

गरम पाण्यानं अंघोळ करू नका 

हिवाळ्यात गरम गरम पाण्यानं अंघोळ करणं हे मोठं सुख असते. गरम गरम पाण्यानं अंघोळी केल्यानं स्किन ड्राय होते. गरम पाणी स्किनमधून नॅचरल ऑइल शोषून घेतं, ज्यामुळे स्किन ड्राय होते. 

गुलाबी ओठांसाठी टूथब्रशचा वापर 

जर का तुमचे ओठ ड्राय झाले आहेत आणि फाटण्यास सुरूवात झाली तर रात्री झोपताना त्यावर क्रिम किंवा लोशन लावून झोपा. मग सकाळी त्यावर टूथब्रथ लावून हलकं हलकं रब करा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होतील. 

नारळाचं तेल

स्किन कोमल आणि हेल्दी ठेवण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करा. नारळाचं तेल केवळ केसांसाठी उपयोगी नाही आहे. दररोज अंघोळ करण्याआधी एक तास आधी शरीर आणि चेहऱ्यावर नारळाच्या तेलानं मालिश करा आणि त्यानंतर अंघोळ करा. यामुळे स्किन कधी ड्राय होणार नाही. 

साबणाचा वापर करणं टाळा

हिवाळ्यात साबणाचा आणि स्क्रबचा वापर करणं टाळा. यामुळे त्वचेवरील ओलसरपणा निघून जातो आणि पोर्स ओपन होतात. 

स्किनवर लावा ही गोष्टींचा

हिवाळ्यात चेहरा आणि शरीरावर लावण्यासाठी ग्लिसरीन, लिंबू आणि 3-4 थेंब गुलाब पाण्याचं मिश्रण लावा. तुम्ही हे बनवून एका बॉटेलमध्ये भरून ठेवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी