Gajar Kheer Recipe: 15 मिनिटात घरच्या घरी बनवा गाजराची खीर 

Gajar Kheer Recipe Sweet Dish: हिवाळ्यात गाजराची खीर खाण्याती मजाच काही और आहे. जर का खीर घरी बनवली असेल तर कुटुंबिय मोठ्या उत्साहाने खातील. खीर कशी बनवायचे ते येथे जाणून घ्या.

Kheer recipe
Gajar Kheer Recipe: 15 मिनिटात घरच्या घरी बनवा गाजराची खीर   |  फोटो सौजन्य: Indiatimes

सध्याच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर येतात. जर का तुम्हा गाजरचा हलवा खाऊन कंटाळा असाल आणि तुम्हाला काही तरी नवीन ट्राय करायचं असेल तर गाजराच्या खीरचा नक्कीच आनंद घ्या. या खीरची चव खूप छान आहे. या खीरमध्ये जास्त साहित्याचा वापर होत नाही. ही खीर रात्री जेवल्यानंतर किंवा दिवसभरात कोणत्याही वेळी सर्व्ह केली जाऊ शकते. चांगली गोष्ट ही आहे की, गाजराची खीर लहान मुलं खूप चवीनं खातील. जाणून घेऊया कशी बनवायची गाजराची खीर 

साहित्य 

 • 2 मध्यम गाजर ( 1 कप किसलेले गाजर) 
 • 2 मोठे चमचे तूप
 • 11/2 कप दूध
 • 2 मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क
 • 5-6 काजू
 • 8-10 मनुका (पर्यायी) 
 • 1 मोठा चमचा साखर
 • 1/4 चमाचा वेलची पावडर

गाजराची खीर बनवण्याची कृती 

 1. प्रथम गाजर चांगले धुवून घ्या आणि त्यानंतर ते किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारिक करा.
 2. मध्यम आचेवर एका नॉन-स्टिक पॅनमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करा. काजू आणि मनुका वेगळे तळून घ्या, ते एका प्लेटमध्ये काढून घ्या.
 3. आता त्याच पॅनमध्ये किसलेला गाजर टाकून 4-5 मिनिटांसाठी धीम्या आचेवर हलवा.
 4. त्यात नंतर दूध टाका, चांगलं मिसळून मध्यम आचेवर उकळवा.
 5. जेव्हा दूध उकळण्यास सुरू झाल्यावर त्यात कंडेंस्ड मिल्क टाका आणि चांगलं मिसळून घ्या. जवळपास 5 मिनिटांसाठी धीम्या आचेवर ते शिजवा आणि अधून-मधून ते हलवत राहा.
 6. स्वादानुसार साखर टाका. कृपया लक्षात असू दे की, कंडेन्स मिल्क आधीपासूनच गोड असतं. 
 7. त्यामुळे थोडी अधिक गोडपणा हवा असेल तितकीच साखर टाका.
 8. मिश्रण घट्ट होईपर्यंत किंवा जवळपास 5 मिनिटांपर्यंत शिजवा. हे जास्तवेळ शिजवू नये नाहीतर गाजर आणि दूध जळण्याची भीती असते.
 9. वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिश्रण हलवा आणि गॅस बंद करा. त्यानंतर खीर थंड होऊ द्या.
 10. शेवटी काजू आणि मनुका टाकून गार्निश करा. तुमच्या आवडीनुसार गाजराची खीर गरम किंवा थंड सर्व्ह करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी