हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती. व्यंगचित्रकार ते राजकीय नेते असा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास आहे. १९६० साली त्यांनी फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातून राजीनामा दिला आणि स्वतःचे मार्मिक नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिकमधून त्यांनी मराठी माणसावरील होणार्या अन्यायाला वाचा फोडली. नंतर १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी बाळासाहेबांनी भूमिका मांडली होती. नंतर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी १९८९ साली सामना नावाचे दैनिक सुरू केले. अखेर १९९५ साली शिवसेना आणि भाजपच्या युतीला यश आले आणि मनोहर जोशी यांच्या रुपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थानी मातोश्री येथे निधन झाले.