Tips for Glowing Skin: विना मेकअप हवाय नॅचरल ग्लो, तर जाणून घ्या या सोप्या स्टेप्स

लाइफफंडा
Updated Feb 17, 2020 | 20:37 IST

Beauty Tips In Marathi: ग्लोइंग स्किन तुमच्या लूकला चार चांद लावतात. तुम्ही विना मेकअपसुद्धा नॅचरल ग्लो मिळवू शकतो. केवळ यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. 

Tips for Glowing Skin
विना मेकअप हवाय नॅचरल ग्लो, तर जाणून घ्या या सोप्या स्टेप्स  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबईः प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं. यासाठी मार्केटमध्ये काही मेकअप प्रोडक्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत. पण केवळ मेकअप केल्यानंतरच सुंदर दिसणं गरजेचं नाही आहे. मेकअपशिवाय सुद्धाही तुम्ही नॅचरल ग्लो मिळवू शकता. त्यासाठी तुम्हांला स्वतःच्या स्किनची केअर करणं खूप गरजेचं आहे. 

स्किन केअरसाठी काही बेसिक रूटीन फॉलो केल्यावर तुम्हांला दररोज चमकती त्वचा मिळेल. यासाठी तुम्हांला जास्त मेहनत करण्याचीही गरज नाही आहे. बस रोज काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

चेहरा क्लीन करा

आपल्या स्किनची काळजी करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला स्वच्छतेवर लक्ष देणं गरजेचं आहे. रात्री झोपताना घाम आणि उशीमधून घाण तुमच्या त्वचेच्या पोर्समध्ये जातात आणि पोर्स बंद करतात. यासाठी सकाळी उठून चेहरा कोणत्याही चांगल्या क्लेंजरनं क्लीन करा. यामुळे तुमची स्किन रिफ्रेशिंग राहते. 

मध 

मध तुमच्या त्वचेसाठी वरदान प्रमाणे काम करतं. यासाठी मध घ्या आणि चेहऱ्यावर याची एक पातळ लेअर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर मध सुकू द्या आणि 10 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळेल. 

बर्फ 

ग्लोइंग स्किनसाठी तुम्हाला कोणताही लांबलचक रूटीन फॉलो करायचा नाही आहे. बर्फानं काही मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो आणता येतो. यासाठी बर्फाचे तुकडे कपड्यात बांधा आणि चेहऱ्यावर चोळा. केवळ दोन मिनिटं असं करा. यामुळे स्किन पोर्स टाइट होते. 

घरी बनवलेले टोनर

जर का तुम्ही बाजारात मिळणारं टोनरचा वापर करू इच्छित नसाल तर घरच्या घरी टोनर बनवा. यासाठी एका काकडीचा रस काढून घ्या आणि त्यात गुलाब पाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. याचा तुम्ही टोनरच्या ऐवजी वापर करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...