Chanakya Niti: ज्यांच्या पत्नीमध्ये हे गुण असतात ते खूप भाग्यवान; तुमच्याही पत्नीचा समावेश आहे?

लाइफफंडा
Updated May 26, 2022 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti In Marathi | आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात उन्नतीकडे आणि प्रगतीकडे वाटचाल करू शकता. चाणक्याचे धोरण स्वीकारूनच चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाले होते.

Wives who have these qualities those husbands are very lucky
ज्यांच्या पत्नीमध्ये हे गुण असतात ते खूप भाग्यवान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरणही सांगितले आहे.
  • आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार आजही समाज आणि कुटुंबात राहण्याचे मार्ग शिकवतात.
  • स्त्रीच्या क्रोधात अर्थात रागामध्ये सर्वकाही जाळून राख होण्याची शक्ती असते.

Chanakya Niti In Marathi | मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात उन्नतीकडे आणि प्रगतीकडे वाटचाल करू शकता. चाणक्याचे धोरण स्वीकारूनच चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाले होते. आचार्य चाणक्यांच्या अनेक चाली आणि धोरणे आजही प्रासंगिक आहेत, त्यांच्या शिकवणी यश मिळविण्यासाठी आणि एक चांगला माणूस बनण्यास अत्यंत लाभदायक आहेत. (Wives who have these qualities those husbands are very lucky). 

अधिक वाचा : नवज्योतसिंग सिद्धू यांना तुरुंगात मिळाले सहाय्यकाचे काम

दरम्यान, असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो तो त्याच्या जीवनात मोठी प्रगती करतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. पण जर एखाद्या स्त्रीने ठरवले तर ती केवळ तिच्या पतीचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकू शकते. खरे तर चाणक्याच्या धोरणात सांगितलेल्या या गोष्टी अंगीकारल्या तर जीवन जगताना स्वर्गाचा भास होऊ शकतो. दरम्यान आज आपण चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या स्त्रियांच्या त्या गुणांबद्दल भाष्य करणार आहोत जे पतीला प्रगतीकडे नेऊ शकतात. 

अधिक वाचा : रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून ४ मुलांना HIV ची लागण

१) जिच्या इच्छा मर्यादित आहेत

चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीच्या मर्यादा तसेच आवडी-निवडी मर्यादीत असतात, तिचा पती भाग्यवान असतो. अनेक वेळा पती महिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी करतात. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते, जर स्त्री मर्यादित इच्छा, समाधानी व्यक्ती असेल तर तिचा नवरा आनंदी राहतो.

२) सुशिक्षित आणि सर्वगुणसंपन्न

स्त्री ही संपूर्ण कुटुंबाची ओळख असते, ती शिक्षित, सुसंस्कृत आणि सर्वगुणसंपन्न असेल तर संपूर्ण कुटुंब खूप आनंदाज जीवन जगते. आचार्य चाणक्य यांच्या मते, असे पुरुष खूप भाग्यवान असतात, ज्यांच्या पत्नीमध्ये काही विशेष गुण असतात. अशी सर्वगुणसंपन्न पत्नी त्यांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा तर बनतेच शिवाय प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत करते.

३) गोड बोलणारी

चाणक्य जी मानतात की जर तुमची पत्नी गोड बोलणारी असेल तर तुमच्यापेक्षा भाग्यवान जगात दुसरी कोणी नाही. अशा गुणांच्या स्त्रियांशी विवाह करणारी व्यक्ती खूप आनंदी जीवन जगते. अशा महिला सर्वांशी चांगले संबंध ठेवतात मग ते नातेवाईक असोत किंवा शेजारी. त्यामुळे तिचे पती आणि कुटुंबीयांचेही कौतुक होत असते. 

४) शांत 

स्त्रीच्या क्रोधात अर्थात रागामध्ये सर्वकाही जाळून राख होण्याची शक्ती असते, त्यामुळे शांत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या पुरुषाला त्याच्या आयुष्यात स्वभावाने शांत पत्नीची साथ मिळते, तो खूप भाग्यवान असतो. अशा पत्नीमुळे घरात सुख-शांती तर राहतेच, पण ती प्रत्येक निर्णय स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हिताचा विचार करून घेते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी