Chanakya Niti For Women : हे गुण असलेली महिला असते श्रेष्ठ पत्नी

woman with these qualities is a great wife : आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये आदर्श पत्नी वा श्रेष्ठ पत्नीचे कोणते गुण नमूद केले आहेत.

Chanakya Niti For Women, woman with these qualities is a great wife
हे 4 गुण असलेली महिला असते श्रेष्ठ पत्नी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हे 4 गुण असलेली महिला असते श्रेष्ठ पत्नी
  • जाणून घेऊ चाणक्य नितीमध्ये नमूद असलेले आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नीचे 4 गुण
  • आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नीमुळे पती तसेच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते

woman with these qualities is a great wife : आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते. आज आपण जाणून घेऊ की आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये आदर्श पत्नी वा श्रेष्ठ पत्नीचे कोणते गुण नमूद केले आहेत.

माणसाचे जीवन अनमोल आहे. हे जीवन यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी जोडीदाराची उत्तम साथ मिळणे आवश्यक आहे. जर आदर्श पत्नी होण्याचे अर्थात श्रेष्ठ पत्नी होण्याचे गुण असलेल्या महिलेशी पुरुषाचे लग्न झाले तर तो पुरुष प्रगती करतो. 

महिला निराशेच्या गर्तेतून पुरुषाला बाहेर काढते आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच आव्हानांचा मुकाबला करून यशस्वी हण्यासाठी पुरुषाला प्रेरणा देते. प्रसंगी चुकांमधून धडा घेऊन पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करते. घरात आलेली संपत्ती राखणे आणि वाढवणे यासाठी पुरुषाला सहकार्य करते. हे करणारी महिला ही आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नी असते. या महिलेमुळे पुरुषाच्या प्रगतीपथावरील प्रवासाला चालना मिळते असे आचार्य चाणक्य सांगतात.

जाणून घेऊ चाणक्य नितीमध्ये नमूद असलेले आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नीचे गुण

  1. शांत स्वभाव : आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नी शांत स्वभावाची असते. ती कोणत्याही परिस्थितीला शांतपणे सामोरे जाते. परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेऊन शांतपणे विचारपूर्वक तोडगा काढते अथवा जी व्यक्ती मार्ग काढत आहे त्या व्यक्तीला पूर्ण सामर्थ्यानिशी तोडगा काढण्यााठी सहकार्य करते. 
  2. सुशिक्षित आणि सुसंस्कारी : आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नी सुशिक्षित आणि सुसंस्कारी. ती स्वतः सोबतच घरातील सर्व सदस्य सुशिक्षित आणि सुसंस्कारी व्हावेत यासाठी झटते. ज्येष्ठांचा आदर करते. लहान आणि मोठ्यांची तसेच आजारी असलेल्यांची काळजी घेते. प्रचंड आत्मविश्वास आणि बुद्धिच्या जोरावर आलेल्या प्रत्येक आव्हानाला सामोरी जाते. अडचणीतून मार्ग काढते.
  3. गोड बोलते : आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नी गोड बोलून इतरांवर प्रभाव टाकते, त्यांची मनं जिंकते. माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणी स्वतःच्या वागण्याबोलण्यातून प्रतिष्ठा मिळवते. 
  4. मर्यादीत इच्छा : ज्या पत्नीच्या स्वतःच्या मर्यादीत इच्छा असतात पण तिला कुटुंबाची प्रगती व्हावी असे वाटते ती स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटते. पतीला पूर्ण सामर्थ्यानिशी साथ देते. अशी पत्नी ही आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नी असते.

आचार्य चाणक्य यांच्या मते आदर्श पत्नी अर्थात श्रेष्ठ पत्नीमुळे पती तसेच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. कुटुंब अडचणीत सापडत नाही आणि अडचणीत सापडले तरी अल्पावधीत मार्ग काढून बाहेर पडते. 

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

चाणक्य निती म्हणजे काय?

चाणक्य यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि  मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास प्रशिक्षित करून मगध जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. पुढे चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत महामंत्री झाले. चाणक्य हेच विष्णूगुप्त होते. त्यांना कौटिल्य या नावानेही ओळखले जात होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्य यांचा मुख्य सहभाग होता. 

चाणक्य यांनी रचलेला  कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक उत्तम ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यात 25 प्रकरणे आणि 6 हजार श्लोक आहेत. ग्रंथाद्वारे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण याबाबत मार्गदर्शन केले आहे. हा अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणारा पहिला मानवी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात नमूद निती ही चाणक्य निती किंवा दंड निती या नावाने ओळखली जाते. 

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

हे उपाय करा आणि Heart Attack चा धोका नैसर्गिकरित्या कमी करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी