women’s day 2023 Messages in Marathi: दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (international women's day) साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. या दिवशी आवर्जून आपल्या आयुष्यातील ‘तिला’ शुभेच्छा मेसेज पाठवतो. तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणीला किंवा आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या महिलेला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश मेसेज आम्ही देत आहोत.
pस्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे.
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एका क्षणात आईवडिलांसाठी
परके होऊन हसत हसत
दुसऱ्याच्या घरी मायेची ज्योत पेटवणं
हे धाडस फक्त
एक स्त्रीच करू शकते
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!